आशिया चषक 2023ला सुरवात झाली आहे. भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली हा भारतीय संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. आशिया चषकात त्याच्या फंलदाजीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. विश्वचषकापूर्वीच विराट अशिया चषकातच ऍक्शन मोडमध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतो. अशात दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एनटिनी याने विराटला बाद करण्याबाबत गोलंदाजांना एक सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोंलंदाज मखाया एंटिनी (Makhaya Ntini) याने सांगितले की, गोलंदाजांनी विराट कोहलीला चिडवण्याची चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असे केले तर, भारतीय फलंदाज कंटाळतील आणि कोणतीही चूक करून बाद होतील. पण जर गोलंदाजाने कोहलीला चिडवले तर त्याचा फटका त्या गोलंदाजाला सहन करावा लागू शकतो कारण भारताच्या अनुभवी फलंदाजाला चिडवल्यावर जास्त उत्साह येतो..
रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना एंटिनी म्हणाला की, “विराट डिवचू करू नका. त्याच्यावर चिडवण्याची चूक करणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर तुम्ही त्याला चिडवले नाही आणि त्याला त्याच्या गतीने खेळू दिले तर त्याला कंटाळा येईल आणि तो चूक करू शकतो. परिणामी तो त्याची विकेट देवू शकतो”
दक्षिण आफ्रिकेसाठी 622 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा एंटिनी पुढे म्हणाला, “मी तुम्हाला विराटबद्दल जे सांगत आहे ते, मी कदाचित प्रत्येक दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला सांगतो जो विराटला गोलंदाजी करतो. कोहली फलंदाजी करत असताना त्याला एक शब्दही बोलू नका. मी पुन्हा सांगतो की कोहलीला काहीही बोलून चिडवू नका. तुम्ही हे करत असाल तर खरं तर तुम्ही विराटला प्रोत्साहन देत आहात. जर तुम्ही विराटला ओळखत असाल तर तो वाट पाहत असतो की, मला कोण चिडवत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज पुढे म्हणाला, “कोहलीला स्पर्धा आणि चिडवणाऱ्या गोष्टी आवडतात. जर तुम्ही त्याला चिडवले तर त्याची एकाग्रता चांगली होते आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्याच्यासमोर शांत राहणे चांगले. (south african bowler talk about virat kohli batting)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाना, तिलक-जडेजाने केले फोटो शेअर
दिग्गज खेळाडू आशिया चषकापूर्वी संघातून पडला बाहेर, सर्वत्र उडाली खळबळ