---Advertisement---

आता फक्त मोजत राहा! सूर्याच्या नावावर आणखी एक विक्रम; बनला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

On: शनिवार, जानेवारी 7, 2023 9:31 PM
Suryakumar-Yadav-Century
---Advertisement---

तो आला, तो खेळला आणि तो चमकला, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील सूर्यकुमार यादव याची खेळी पाहून प्रत्येक चाहता असेच म्हणत असेल. राजकोटच्या मैदानावर शनिवारी (दि. 07 जानेवारी) सूर्यकुमारने वादळी शतक झळकावले. यासोबतच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील मोठ्या विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, त्याने ही कामगिरी करण्याची दुसरी वेळ ठरली.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजांनीही प्राथमिकरीत्या हा निर्णय सार्थ ठरवला. या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 229 धावा चोपल्या. या धावा करताना भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि विक्रम नावावर केला. सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला.

https://twitter.com/BCCI/status/1611738984664956930

सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार आणि 9 षटकारांची बरसात केली. त्याने अशी कामगिरी करण्याची दुसरी वेळ होती. यापूर्वी सूर्यकुमारने 2022मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक 117 धावा कुटल्या होत्या. या यादीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या नावाचाही समावेश आहे. मॅक्सवेलने 2019मध्ये भारताविरुद्ध फलंदाजी करताना नाबाद 113 धावा कुटल्या होत्या.

टी20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
117 धावा- सूर्यकुमार यादव, विरुद्ध- इंग्लंड (2022)
113 धावा- ग्लेन मॅक्सवेल, विरुद्ध- भारत (2019)*
112 धावा- सूर्यकुमार यादव, विरुद्ध- श्रीलंका (2023)*

सूर्यकुमार यादवची पहिल्या दोन टी20 सामन्यातील कामगिरी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, त्या सामन्यात सूर्यकुमारला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने पहिल्या टी20त फक्त 7 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसरा टी20 सामना भारताला गमवावा लागला होता. त्या सामन्यात सूर्यकुमारची बॅट तळपली होती. त्याने 36 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या होत्या. (Highest score by No 4 batters in men’s T20Is suryakumar yadav name also include)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा ‘सूर्य’ नव्याने लिहितोय इतिहास! श्रीलंकन गोलंदाजांचा बाजार उठवत रचला मोठा विक्रम
अशी राहिलीये टीम इंडियाच्या नव्या निवडसमिती सदस्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द; अनुभवाच्या बाबतीत…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---