---Advertisement---

विलियम्सनचा धमाका! बनला फॉलोऑननंतर कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू, यादीत टॉपला ‘हे’ भारतीय

Kane-Williamson
---Advertisement---

आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. मग तो टी20 सामना असो, वनडे सामना असो किंवा कसोटी सामना असो. कोणत्याही सामन्यात खेळाडू संघाच्या विजयात सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जे खेळाडू सर्वाधिक धावा करतात, त्यांची वाहवा सर्वत्र होते. तसेच, त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंदही होते. अशाच खास विक्रमाची नोंद न्यूझीलंडच्या एक-दोन नाही, तर तब्बल 4 खेळाडूंच्या नावावर झाली आहे. मात्र, या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचे दोन दिग्गज आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊयात…

नुकताच न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने 1 धावेने विजय साकारला. तसचे, मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या विजयासोबतच न्यूझीलंडच्या चार फलंदाजांनी शानदार कामगिरी करत खास विक्रमाच्या यादीत स्वत:चे नाव नोंदवले.

तर झाले असे की, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने 8 विकेट्स गमावत 435 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजीला येत सर्व विकेट्स गमावत 209 धावाच केल्या. यानंतर 226 धावांचा फॉलोऑन घेत न्यूझीलंडने सर्व विकेट्स गमावत 483 धावा चोपल्या. तसेच, इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 256 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने 1 धावेने जिंकला.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1630416341948858368

विलियम्सनचा पराक्रम
फॉलोऑन मिळाल्यानंतर न्यूझीलंडकडून केन विलियम्सन (Kane Williamson) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने यादरम्यान 282 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 132 धावांचा पाऊस पाडला. यासोबतच विलियम्सनचा समावेश फॉलोऑन मिळाल्यानंतर कसोटी जिंकणाऱ्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत झाला. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याच्याव्यतिरिक्त टॉम ब्लंडेल 90 धावा करत या यादीत सहाव्या स्थानी, टॉम लॅथम 83 धावांसह सातव्या आणि 61 धावांसह डेवॉन कॉनवे आठव्या स्थानी आहे.

यादीत अव्वलस्थानी भारतीय
या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा माजी दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) असून त्याने 2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या विजयी कसोटीत 281 धावांची खेळी साकारली होती. लक्ष्मणनंतर दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड (Rahul Dravid) असून त्यानेही 2001मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावा चोपल्या होत्या. यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंडचे माजी खेळाडू इयान बॉथम असून त्यांनी 1981 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयी कसोटीत 149 धावांची खेळी साकारली होती. या यादीत पाचव्या स्थानी अल्बर्ट वॉर्ड असून त्यांनी 1894मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच 117 धावांची खेळी केली होती. (Highest Score during Follow On where team ended up winning the Test see list)

फॉलोऑन मिळालेल्या कसोटीत विजय मिळवणाऱ्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
281- व्हीव्हीएस लक्ष्मण (2001)
180- राहुल द्रविड (2001)
149- इयान बॉथम (1981)
132- केन विलियम्सन (2023)*
117- अल्बर्ट वॉर्ड (1894)
90- टॉम ब्लंडेल (2023)*
83- टॉम लॅथम (2023)*
61- डेवॉन कॉनवे (2023)*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास
कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---