मुंबई | किंग्ज ११ पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा करणाऱ्या केएल राहुलची मात्र चांगलीच निराशा झाली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटाकांत ८ बाद १८६ धावा केल्या. त्यात पोलार्ड ५० तर कृणाल पंड्या ३२ यांच्या धावांचा समावेश होता. त्यानंतर पंजाबकडून केएल राहुलने ९४ तर अॅराॅन फिंचने ४६ धावा केल्या.
यामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. या सामन्यात ६ धावांनी शतक हुकलेल्या केएल राहुलचे मात्र सर्वच स्तरातुन जोरदार कौतुक होत आहे.
परंतु याबरोबर त्याच्या नावावर एक असा विक्रम झाला जो कोणत्याही खेळाडूला आपल्या नावावर झालेला आवडणार नाही.
धावांचा अयशस्वी पाठलाग करताना दोन वेळा त्याने 90 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अन्य संघ सहकाऱ्यांनी योग्यवेळी साथ न दिल्यामुळे केएल राहुलच्या पंजाबला दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.
8मे रोजी राजस्थान राॅयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 95 धावा केल्या होत्या. हा सामना पंजाब संघाला 15 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. धावांचा अयशस्वी पाठलाग करताना सलामीवीराने केलेल्या नाबाद ९५ या सर्वाधिक धावा ठरल्या होत्या.
तर कालच्या सामन्यात त्याने 94 धावांची खेळी कली.
धावांचा अयशस्वी पाठलाग करताना फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा-
100- युसुफ पठाण, 2010
95*- केएल राहुल, 2018
95- मिचेल मार्श, 2011
95- मनन व्होरा, 2017
94*- नमन ओझा, 2010
94- केएल राहुल, 2018 (काल)
ठळक बातम्या-
–संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!
–आणि पंड्या-राहुलने केली जर्सीची अदलाबदली, चाहते भावुक!