---Advertisement---

RCBvsPBKS : बेंगलोरने फलकावर लावल्या २०५ धावा अन् तिथेच निश्चित झाला पराभव, वाचा सविस्तर

On: सोमवार, मार्च 28, 2022 3:44 PM
Shahrukh-Khan-Odean-Smith
---Advertisement---

रविवारी (२७ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) पहिला डबल हेडर झाला. यातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात खेळवला गेला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात धावांची बरसात झाली. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २०५ धावा फलकावर लावल्या. बेंगलोरच्या २०६ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना पंजाबनेही शानदार खेळ दाखवला आणि १९ षटकांमध्ये ५ विकेट्स शिल्लक असतानाच बेंगलोरचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला.

बेंगलोरच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पंजाबने केलेला हा चौथा सर्वात यशस्वी पाठलाग (Highest Successful Chase Against RCB) आहे. यापूर्वी २०१९ मध्ये बेंगलोरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सलाही बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा कोलकात्याने यशस्वी पाठलाग केला होता.

असेच काहीसे चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही झाले होते, तेही एकदा नव्हे दोनदा. २०१८ मध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरच्या २०६ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सामना खिशात घातला होता. तर २०१२ मध्ये चेन्नईने बेंगलोरचे २०६ धावांचे लक्ष्य सहज पार करत विजय मिळवला होता. अशाप्रकारे आतापर्यंत धावफलकावर सर्वोच्च सांघिक धावा (२०५ धावा) नोंदवल्यानंतरही बेंगलोरने ४ वेळा पराभवाचे तोंड पाहिले आहे.

उभय संघांनी खोऱ्याने काढल्या धावा
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, बेंगलोरकडून प्रथम फलंदाजी करताना नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याने विस्फोटक खेळी केली होती. त्याने सलामीला फलंदाजीला येत ५७ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ३ चौकार मारत ८८ धावा फटकावल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने २९ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावांची खेळी केली होती. परिणामी २ विकेट्सच्या नुकसानावर बेंगलोरने पंजाबला २०६ धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने सांघिक खेळ दाखवला. पंजाबकडून सलामीवीर शिखर धवन (४३ धावा) आणि भानुका राजपक्ष (४३ धावा) यांनी शानदार खेळी केल्या. तसेच कर्णधार मयंक अगरवाल यानेही ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सामना फिनिश करण्याची जबाबदारी शाहरूख खान आणि ओडेन स्मिथ यांनी निभावली. शाहरूखने २४ तर स्मिथने २५ धावांचे योगदान देत संघाला सामना जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल

विश्वचषकातून ‘आऊट’ झालेल्या महिला संघाची विराटकडून पाठराखण, ट्वीट वाचून कराल कौतुक

अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---