आज भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ६२२ धावांचा डोंगर उभा केला. याबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारताने तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला.
परंतु आपण एक गोष्ट ऐकून आश्चर्यचकित व्हाल की गेल्या एका वर्षात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ७ वेळा झाला असून त्यातील ६ वेळा हा विक्रम भारताने केला आहे.
भारताने फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशविरुद्ध ६८७/६, इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीमध्ये डिसेंबर महिन्यात Ind: ७५९/७, रांची कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६०३/९, डिसेंबर महिन्यात मुंबई कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६३१/१०, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये ६००/१० आणि आज दुसऱ्या कसोटीमध्ये ६२२/९ अशा त्या कामगिरी आहेत.
गेल्या एका वर्षात भारत सोडून केवळ ऑस्ट्रेलियाला ६०० पेक्षा जास्त धावा एकदा करता आल्या आहेत. त्यांनी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध ६२४/८ अशी कामगिरी केली होती.