---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे ३ गोलंदाज

On: शुक्रवार, मे 14, 2021 10:33 PM
---Advertisement---

येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर जागतिक क्रिकेट मधील महामुकाबला रंगेल. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येतील. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. विविध मालिकांमधून दमदार कामगिरी करत हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले असून आता या अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

या अंतिम सामन्यात दोन्ही संघांसाठी त्यांच्या गोलंदाजांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण जो संघ प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी बाद करेल, तोच संघ विजेतेपद पटकावू शकेल. त्याचप्रमाणे इंग्लंडमधील सामन्यात स्विंगची भूमिका देखील महत्त्वाची असेल. याच निमित्ताने संपूर्ण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स कोणत्या गोलंदाजांनी घेतल्या आहेत, याचा या लेखात आढावा घेऊया.

३) ट्रेंट बोल्ट –
डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट भारतीय चाहत्यांना आयपीएलमुळे चांगलाच परिचयाचा आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बोल्टने न्यूझीलंडच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने या स्पर्धेत ९ सामन्यातील १८ डावात ३४ विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीने अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी तो आता सिद्ध झाला आहे.

२) कायले जेमिसन –
न्यूझीलंडसाठी या युवा गोलंदाजाने २०२० सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र अल्पावधीतच त्याने आपली छाप सोडली आहे. तगडी उंची असलेल्या जेमिसनने भारताविरुद्धच पदार्पण केले होते. अतिरिक्त उसळी आणि स्विंग ही त्याच्या गोलंदाजीची बलस्थाने आहेत. त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६ सामन्यातच ३६ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

१) टीम साऊदी –
टीम साऊदी सध्याच्या घडीला न्यूझीलंडचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करण्याच्या कलेमुळे त्याने आजवर भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणले आहे. बोल्ट आणि साऊदी ही जोडगोळी अंतिम सामन्यात भारतासाठी घातक ठरू शकते. साऊदी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यात १० कसोटी सामने खेळतांना ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तो पुन्हा आलाय! जोफ्रा आर्चरने केले धडाकेबाज पुनरागमन

आयपीएलमध्ये एकाच षटकात या दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज

वेस्ट क्रिकेटचा पुढील चार महिन्यांचा कार्यक्रम जाहीर, या संघांशी करणार दोन हात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---