क्रिकेटच्या मैदानात वाद होणे हे नवीन नाही. तर दुसरीकडे सेलिब्रिटींमधील वाद दिवसेंदिवस दुर्मिळ होताना दिसतात. पण बांगलादेशमध्ये आयोजित केलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये सहभागी खेळाडूंमध्ये झालेला वाद एका वेगळ्याच उंचीला पोहोचला. खेळाडूंमध्ये अक्षरशः बॅटने भांडणे झाली असून एकूण 6 जणांना रुग्णालयात भरती केले गेले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार सिनेनिर्माते मुस्तफा कमाल राज आणि दिपंकर दीपोन यांच्या संघांमध्ये हा वाद झाला. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही संघांमधील खेळाडू सुरुवातील शाब्दिक वादात उतरले. नंतर हा वाद हातापाईमध्ये बदलला. काही खेळाडूंना एकमेकांच्या कानशिलात लगावल्याचे सांगितले जात आहेत. वाद एवढ्यावर न थांबता दोन्ही संघांमध्ये बॅट आणि स्टंप्सने मारामारी झाली. यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना दुखापती झाल्या असून 6 खेळाडूंना रुग्णालयात दाखल करावे लागले.
बांगलादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये दोन संघात बॅट आणि स्टंप्सने मारामारी –
Celebrity Cricket League has turned into WWE Royal Rumble. ????
– 6 people got injured
– Tournament got cancelled before semis30+ year old male & female adults fighting over boundary & out decision in a ‘friendly’ tournament. ???? pic.twitter.com/FOAxEI00rz
— Saif Ahmed ???????? (@saifahmed75) September 30, 2023
शिशीर सरदार, राज रिपा, जॉय चौधरी, अतिक रहमान, शेख शुभो आणि अशिक जाहिद अशी जखमिंची नावे सांगितली गेली आहेत. वृत्तांनुसार राज रिपा हिने असा आरोप केला आहे की, तिच्या कारकिर्दीवर या वादाचा परिणाम झाला किंवा इतर काही गोष्टी घडल्या, तर यासाठी मुस्तफा कमल राज जबाबदार असेल. दरम्यान, ही लीग सुरू राहिली, तर पुढच्या सामन्यांमध्येही अशाच प्रकारे वाद पाहायला मिळू शकतो, हे व्यवस्थापनाने लक्षात घेतले. याच कारणास्तव ही लीग अर्ध्यातून रद्द केली गेली आहे.
Hilarious scenes in Celebrity Cricket League. ????
A celebrity crying because an umpire didn’t give a boundary which was clearly a four.
Two teams fought badly, 6 people injured in hospital and the tournament is now cancelled!!! pic.twitter.com/brEYCKzIw3
— Saif Ahmed ???????? (@saifahmed75) September 30, 2023
दरम्यान, बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळताना अनेकदा वाद पाहायला मिळतो. त्यांच्या राष्ट्रीय संघातील काही खेळाडूंनी लाईव्ह सामन्यात अशा प्रकारे वाद घातला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. (Hilarious scenes in Celebrity Cricket League in Bangladesh )
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी युवीची अश्विनला नापसंती! ‘या’ अष्टपैलूच्या पारड्यात टाकले वजन
डेल स्टेनची भविष्यवाणी! विश्वचषकात धमका करतील ‘हे’ पाच गोलंदाज, दिग्गजांनाच नाही दिले स्थान






