---Advertisement---

पचवायला थोडं जड जाईल अशा विक्रमाच्या यादीत ‘शर्माजी का लडका’

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 12:27 AM
rohit golden duck
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना सेंट किट्स येथे खेळला गेला. पहिला सामना गमावलेल्या वेस्ट इंडीजने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा हा पहिल्या चेंडूवर बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे टी२० क्रिकेटमधील एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला.

रोहित गोल्डन डकवर बाद

पहिल्या सामन्यात ६४ धावांची लाजवाब खेळी खेळलेला रोहित दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय ‌‌‌‌‌‌‌टी२० मध्ये ३५०० धावांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, सर्वांच्या अपेक्षांंवर पाणी फिरले गेले. सामन्यातील पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉयने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रोहितने अकील होसेनच्या हाती सोपा झेल दिला. ‌‌

रोहित गोल्डन डकवर बाद होताच त्याच्या नावे एक‌ लाजिरवाणा विक्रम जमा झाला. रोहित आता भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेला फलंदाज बनला आहे. ‌या विपरीत गोष्ट म्हणजे, रोहित हाच भारताचा टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज देखील आहे. रोहित भारतासाठी सर्वाधिक टी२० धावा बनवणारा फलंदाज आहे.‌ त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ‌‌‌‌‌३४४३ धावा जमा आहेत.‌ तसेच रोहित हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चार शतके झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३१० चौकार व १५९ षटकार बाहेर आले आहेत.

भारताची खराब सुरुवात

सलग दुसरा विजय मिळवण्याचा इराद्याने मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित पाठोपाठ सूर्यकुमार यादव ११ धावा काढून बाद झाला. तिसरा मुंबईकर श्रेयस अय्यरही फार काळ तग धरू शकला नाही. भारताने आपले हे तिन्ही महत्त्वाचे गडी‌ केवळ ४० धावांमध्ये गमावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

अगोदर पिता आणि आता पती बनलाय ‘हा’ क्रिकेटपटू, थाटात पार पडलं शुभमंगल

शिखर धवनचा हट्टी शेफ! मालक सुट्टी देत नव्हता, पण तरीही घेतलीच

ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---