क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणालाही तितकेच महत्त्व असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन्स द मॅचेस’ असे म्हटले जाते. शुक्रवारी (११ मार्च) झालेल्या मार्श कप २०२२ (Marsh Cup 2022) मधील (ऑस्ट्रेलिया वनडे कप) अंतिम सामन्यात हिल्टन कार्टराइट (Hilton Cartwright catch) याने ही संज्ञा खरी असल्याचेही सिद्ध करून दाखवले आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साउथ वेल्स (Western Australia vs New South Wales, Final) यांच्यात झालेल्या मार्श कप अंतिम सामन्यात (Marsh Cup Final) कार्टराइटने फलंदाज मोइसेस हेन्रिक्स याचा अप्रतिम झेल टिपत सामन्याचा कायापालट केला आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला १८ धावांनी अंतिम सामना जिंकून दिला.
त्याचे झाले असे की, न्यू साउथ वेल्सच्या डावादरम्यान संघ ४४ व्या षटकापर्यंत ७ बाद २०४ धावांवर होता. फलंदाज हेन्रिक्स ७४ चेंडूंमध्ये ४३ धावा करून मैदानावर टिकून होता. त्याच्या न्यू साउथ वेल्स संघाला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. अशा स्थितीत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एश्टन टर्नर याने चायनामन गोलंदाज डार्सी शॉर्ट याला डावातील ४५ वे षटक टाकण्यासाठी पाठवले होते. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हेन्रिक्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि हेन्रिक्सने गोलंदाजाच्या बरोबर डोक्यावरून हवाई फटका मारला.
परंतु लाँग ऑनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या कार्टराइटने त्याच्या अपेक्षांना धुळीस मिळवले. लाँग ऑनच्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या कार्टराइटने चेंडूवर अचूक नजर ठेवत डाइव्ह मारली आणि दोन्ही हातांनी चेंडूही पकडला. अशाप्रकारे अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या हेन्रिक्सला कार्टराइटने ४३ धावांवरच पव्हेलियनला पाठवले.
What a catch from Hilton Cartwright in the Domestic ODI Cup final. pic.twitter.com/BhiuXlOw30
— Johns. (@CricCrazyJohns) March 11, 2022
त्याच्यानंतर ऍडम झम्पा आणि तनवीर संघा यांना अधिकवेळ संघासाठी झुंज देता आली नाही. परिणामी वेस्ट ऑस्ट्रेलियाच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यू साउथ वेल्सचा संघ ४६.३ षटकातच २०७ धावांवर गारद झाला आणि वेस्ट ऑस्ट्रेलियाने १८ धावांनी मार्श कप उंचावला.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक विजेत्या प्लेइंग इलेव्हनमधील ‘हा’ एकटा खेळाडू दिसतोय आता मैदानावर; इतरांनी टांगले बूट
मार्क वुडच्या दुखापतीने वाढली सुपरजायंट्सची चिंता; साडेसात कोटी पाण्यात जाण्याची भीती
“आता रोहितने ‘तो’ फटका खेळणे बंद करावे” भारतीय दिग्गजाचा हिटमॅनला सल्ला