भारताची स्टार धावपटू हिमादासने आत्तापर्यंत अनेक मोठे यश मिळवले आहे. तिच्या यशाच्या कारकिर्दीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिची शुक्रवारी(२६ फेब्रुवारी) आसाम पोलिसमध्ये उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवल यांनी गुवाहाटी येथे झालेल्या कार्यक्रमात तिला निवृत्तीचे अधिकृत पत्र सोपवले. यावेळी ५९७ उपनिरीक्षकांची देखील भरती करण्यात आली.
हिमा दासने उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर एक ट्विट केले आहे. यात तिने म्हटले आहे की ‘माझे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याने मी आनंदी आहे. उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. मी हे पद गर्वाने भुषवेल. मी मुख्यमंत्र्यांची आभारी आहे. तसेच मी किरण रिजिजू आणि हिमंत बिस्वा यांची त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.’
तसेच तिने पुढे म्हटले की ‘मी माझ्या पालकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे. तसेच माझ्या मार्गदर्शकांचे आणि ऍथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचेही आभार मानते. त्याचबरोबर आसाममधील नागरिकांचे आणि माझ्या चाहत्यांबद्दलही मी कृतज्ञ आहे.’
I'm so happy that one of my biggest dreams came true today. I am proud to be the DSP, @assampolice .
It's an honour I will always wear with pride.
I would like to thank our CM @sarbanandsonwal sir, @himantabiswa sir and @KirenRijiju sir for their constant support.Contd..1/2 pic.twitter.com/ftgA16goqf
— Hima (mon jai) (@HimaDas8) February 26, 2021
2/2
I would also like to thank my parents for believing and supporting me, my coaches, @afiindia, the people of Assam and all my fans.#police #dream #dsppolice #khakhi
— Hima (mon jai) (@HimaDas8) February 26, 2021
या महिन्याच्या सुरुवातीला हिमा दासला उपअधीक्षक पदी नियुक्त करण्याची झाली होती घोषणा
याच महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दासला राज्याची पोलिस उपअधिक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. सोनोवाल यांच्या मंत्रिमडळाने राज्यातील एकात्मिक क्रिडा धोरणात सुधारणा करण्याचेही ठरवले आहे. त्या अनुशंगाने त्यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रिडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार हिमा दासलाही नियुक्त करण्यात आले आहे.
हिमा दासविषयी थोडेसे…
हिमा दास ही आसामच्या नगाव जिल्ह्यातील धिंग गावची राहणारी आहे. तिचे वडील एक सामान्य शेतकरी असून ते भाताची शेती करतात. ती आपल्या ६ भावा-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. हिमा लहान असताना मुलांसोबत फुटबॉल खेळत असायची आणि तिला मोठे झाल्यानंतर प्रसिद्ध स्ट्राईकर बनायचे होते. परंतु पुढे तिने धावपटूच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मोठे यशही साध्य केले.
हिमाने २०१८ मध्ये फिनलँड येथे २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशीपमध्ये जागतिक विजेतेपद जिंकले होते. अशी मोलाची कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे. २० वर्षीय हिमाने २०१८मध्ये २० वर्षांखालील विश्वविजेतेपदाव्यतिरिक्त जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्य, चार वेळा ४०० मीटरमध्ये रिले आणि चार वेळा ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी तिला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjun Award) मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम
दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट