हरियाणा येथे आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. मंगळवारी (दि. ०७ जून) खेळण्यात आलेल्या या सामन्यात हिमाचल प्रदेश संघाने यजमान हरियाणा संघाला अंतिम सामन्यात धूळ चारली. हा सामना चांगलाच रोमांचक होता. अटीतटीच्या सामन्यात हिमाचल आणि हरियाणा संघात ३४-३४ गुणांनी बरोबरीत सुटला. मात्र, नंतर टायब्रेकरने हिमाचल संघाने हरियाणाला धूळ चारली आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा!
मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Himachal Pradesh Chief Minister Jairam Thakur) यांनी ‘खेलो इंडिया युथ गेम्स’मध्ये (Khelo India Youth Games) हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) पुरुष कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर शुभेच्छा दिल्या.
Team Himachal Pradesh beat Team Haryana in the Kabaddi Boys event at the #KheloIndiaYouthGames2021.
Catch some glimpses of the thrilling match here!😍 #KIYG2021 #UmeedSeYakeenTak pic.twitter.com/qrVo5xpwE8
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) June 7, 2022
त्यांनी म्हटले की, “हरियाणाच्या पंचकूला येथे आयोजित या स्पर्धेत हिमाचलच्या पुरुष कबड्डी संघाने अंतिम सामन्यात हरियाणाला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. ही कामगिरी हिमाचलच्या सर्वांसाठी गौरवाचा विषय आहे. तसेच, यासाठी संघाचे सर्व सदस्य, संघाचे प्रशिक्षक आणि मॅनेजर यांच्यासह संपूर्ण स्टाफही शुभेच्छाला पात्र आहे.”
#HimachalPradesh team dancing it out to celebrate their win 💯🥳
Well Played Boys💯#KheloIndia #KIYG2021 #UmeedSeYakeenTak @ianuragthakur @NisithPramanik @dsya_haryana @TheOfficialSBI @pnbindia @Dream11 @ddsportschannel @StarSportsIndia @YASMinistry @IndiaSports pic.twitter.com/CQiyVJtcZJ
— Khelo India (@kheloindia) June 7, 2022
विशेष म्हणजे, हिमाचलच्या बिलासपूर जिल्हा आणि नालागडच्या प्रत्येक गावात कबड्डी खेळली जाते. नालागडला कबड्डीची नर्सरी मानले जाते. येथूनच अजय ठाकूर (Ajay Thakur) याच्यासारखे तगडे कबड्डीपटू भारताला मिळाले. त्याने कबड्डी स्पर्धेत अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या संघाचे नेतृत्वही केले आहे. याव्यतिरिक्त हिमाचलच्या कविता ठाकूर हिच्याव्यतिरिक्त अनेक महिला खेळाडूंनीही चांगले नाव कमावले आहे. अजय ठाकूर हिमाचल प्रदेश पोलिसात डीएसपीच्या पदावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत विनाशुल्क कबड्डी प्रशिक्षण शिबीर
कबड्डी खेळाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान मंजूर
मुंबई शहरचा कुमार-कुमारी गटाचा संघ जाहीर