---Advertisement---

धोनीनंतर आता हा तिकीट कलेक्टर असणारा क्रिकेटपटू ठोठावतोय टीम इंडियाचे दार

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 12:06 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) एकेकाळी तिकीट कलेक्टर होता. त्याचा एक तिकीट कलेक्टर ते सर्वोत्कृष्ट कर्णधार हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता अशाच प्रकारचा एक तिकीट कलेक्टर भारतीय संघाला मिळू शकतो.

सध्या सुरू असलेल्या रणजी ट्राॅफीत एक खेळाडू आहे जो तिकीट कलेक्टर आहे. परंतु त्याने एक क्रिकेटपटू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. हरियाणाचा हिमांशु सांगवान (Himanshu Sangwan) हा खेळाडू एक दिवशी भारतीय संघाचा स्टार खेळाडू बनू शकतो.

याच पार्श्वभूमीवर हिमांशू आपल्या मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या चिंतेचा विषय बनत आहे.

सध्या हिमांशू  रेल्वेच्या संघाकडून रणजी ट्राॅफी (Ranji Trophy) खेळत आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टरचे काम करणाऱ्या हिमांशूने याच वर्षी प्रथम श्रेणी (First Class), अ दर्जाचे क्रिकेट (List A) आणि ट्वेंटी20 मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते.

तसेच, यापूर्वी हिमांशूला कोणीही ओळखत नव्हते. परंतु मुंबई (Mumbai) संघाविरुद्ध रेल्वेसंघाकडून (Railway) चांगली कामगिरी केल्यानंतर हिमांशूची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई आणि रेल्वे संघात खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात हिमांशूच्या चांगल्या कामगिरीमुळे रेल्वेने 41 वेळा विजेत्या राहणाऱ्या मुंबई संघाला पराभूत केले.

हिमांशूने मागील सामन्यात 6 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात त्याने एक विकेट घेतला होता. तर, दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत मुंबईचा डाव 198  धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

हिमांशूने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामन्यात 21.50 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---