क्रिकेटप्रेमी सध्या आशिया चषाक स्पर्धेच्या आगामी हंगामाची वाट पाहत आहेत. २७ ऑगस्ट रोजी हा हंगाम सुरू होणार आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. चाहते स्टार स्पोर्ट्सवर आशिया चषकातील सर्व सामने लाईव्ह पाहू शकतात. सामना रोमांचक बनवण्यासाठी खेळाडूंचे प्रदर्शन जेवढे कारणीभूत असते, तेवढीच महत्वाची असते ती म्हणजे समालोचकांची भूमिका. आशिया चषाकासाठी हिंदी समालोचकांचा पॅनक घोषित झाला आहे, ज्यांच्यावर चाहत्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी असेल.
आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022 ) मधील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांमध्ये २७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करतील. आशिया चषकात हिंदी भाषिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी भारतीय संघाचे माजी दिग्गज सज्ज झाले आहेत. या हिंदी समालोचकांच्या पॅनलमध्ये संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar), गौतम गंभीर (Gautam Gambhir), आकाश चोप्रा (Aakash Chopra), जतिन सापरु (Jatin Sapru), संजय बांगर (Sanjay Bangar), दीप दासगुप्ता (Deep Dasgupta), इरफान पठाण (Irfan Pathan) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. (Hindi commentary Panel)
आशिया चषकाचे वेळापत्रक –
२७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध संघ निश्चित नाही
१ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध संघ निश्चित नाही
आशिया चषकाची लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केली जाईल. आशिया चषक ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा पद्धतीने खेळले जाणार आहेत. लीग स्टेज संपल्यानतंर पुढच्या फेरीसाठी संघ निश्चित होतील. अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. आधी ठरल्याप्रमाणे आशिया चषक श्रीलंकेत खेळला जाणार होता. मात्र, त्याठिकाणी आर्धिक आणि राजकीय संकट उद्भवल्यामुळे आता ही स्पर्धा यूएईत खेळली जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला माझी गरज…’ अनेक वर्ष एकत्र खेळलेल्या डिव्हिलियर्सने विराटला दिला प्रेमाचा सल्ला
अस्पायर एफसीचा सलग दुसरा विजय; नवी मुंबईच्या एफएसआयविरुद्ध नोंदवले सात गोल
‘सोन्याच्या बदल्यात पितळ!’ आफ्रिदीची जागा घेणाऱ्या हसनैनची आकडेवारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल