पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना, डीव्हीसीए, केडन्स या संघांनी पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. अर्शिन कुलकर्णीची द्विशतकी, ओम भोसले, साहिल चुरी, मिझान सय्यद, अखिलेश गवळे यांची शतकी खेळी.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी पीवायसी संघाने पहिल्या डावात 67 षटकात 7बाद 286धावा करून आपला डाव घोषित केला. तत्पूर्वी काल युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा पहिला डाव 38.2 षटकात सर्वबाद 100 धावावर कोसळला. यात साहिल चुरीने 74चेंडूत 11चौकार व 7 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 101 धावा चोपल्या. त्याला श्रेयश वाळेकर 94, अमेय भावे 37, स्वराज चव्हाण 18 यांनी धावा केल्या. पीवायसी संघाने पहिल्या डावात १८६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने आज दिवस अखेर 55 षटकात 8बाद 217धावा केल्या. यात ऋतुराज धुळगुडे 57, निखिल जोशी 35, रणवीर सिंग चौहान 26, हर्षवर्धन टिंगरे 22, निमीर जोशी 25 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून गुरवीर सिंग सैनी(3-51), स्वराज चव्हाण(2-67), अब्दुस सलाम(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली. पीवायसी हिंदु जिमखाना व युनायटेड स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पीवायसीने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.
वीरांगना मैदानावरील लढतीत डीव्हीसीएच्या 45 षटकात 3बाद 245धावापासून आज खेळ पुढे सुरु झाला. याआधी काल पुना क्लबचा पहिला डाव 41 षटकात सर्वबाद 187 धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात डीव्हीसीए संघाने 90 षटकात 4बाद 533धावाचा डोंगर उभा केला. यामध्ये ओम भोसलेने धडाकेबाज फलंदाजी करताना 198चेंडूत 21चौकार व 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 196 धावांची खेळी केली. त्याला मिझान सय्यदने 120चेंडूत 12चौकार ,2 षट्काराच्या मदतीने नाबाद 105 धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या गडयासाठी २२५ चेंडूत २३२ धावांची भागीदारी केली व संघाला पहिल्या डावात ३४६ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात पुना क्लब संघाने आज दिवस अखेर 44 षटकात 7बाद 255धावा केल्या. यात अखिलेश गवळेने 108 चेंडूत 16चौकाराच्या मदतीने नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली. सामना अनिर्णित राहिल्यामुळे डीव्हीसीए संघाने पहिल्या डावातील आघाडीवर विजय मिळवला.
बारणे क्रिकेट अकादमी मैदानावरील सामन्यात केडन्स संघाचा आज 30 षटकात बिनबाद 192धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा पहिला डाव 46.2 षटकात सर्वबाद 258धावावर आटोपला. याच्या उत्तरात केडन्स संघाने 82 षटकात 7बाद 418धावावर आपला पहिला घोषित केला. यात अर्शिन कुलकर्णीने धडाकेबाज फलंदाजी करताना 203चेंडूत 28 चौकार व 5 षट्काराच्या मदतीने 227 धावांची द्विशतकी खेळी केली. अर्शिनला अजिंक्य गायकवाडने 60 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने २०१ चेंडूत २०६ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरवात करून दिली. त्यानंतर अर्शिनने हृषिकेश मोटकर(37धावा)च्या साथीत १२२ चेंडूत ८६ धावांची भागीदारी करून संघाला आघाडी मिळवून दिली. अँबिशियसकडून वैभव विभुतेने 118धावात 4 गडी बाद केले. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर केडन्स संघाने विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 38.2 षटकात सर्वबाद 100 धावा (हर्षवर्धन टिंगरे 23(49,3×4,1×6), अद्वैय शिधये 15, निमीर जोशी 13, अब्दुस अस्लम 4-14, स्वराज चव्हाण 3-16, साहिल चुरी 2-22, आदित्य डावरे 1-30) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 67 षटकात 7बाद 286धावा (साहिल चुरी नाबाद 101(74,11×4,7×6), श्रेयश वाळेकर 94 (139,8×4,3×6), अमेय भावे 37(87,7×4), स्वराज चव्हाण 18, अद्वय शिधये 4-78, आदित्य राजहंस 2-77); पीवायसीकडे पहिल्या डावात 186 धावांची आघाडी;
दुसरा डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 55 षटकात 8बाद 217धावा (ऋतुराज धुळगुडे 57(84,5×4,1×6), निखिल जोशी 35, रणवीर सिंग चौहान 26, हर्षवर्धन टिंगरे 22, निमीर जोशी 25, गुरवीर सिंग सैनी 3-51, स्वराज चव्हाण 2-67, अब्दुस सलाम 1-11) वि.पीवायसी हिंदु जिमखाना; सामना अनिर्णित पीवायसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी;
वीरांगना मैदानः पुना क्लबः 41 षटकात सर्वबाद 187 धावा (शंतनु ढगे 82(98,13×4,2×6), सौरभ दोडके 24, ओम पवार नाबाद 20, मनोज यादव 4-60, ओंकार राजपूत 3-28, ऍलन रॉड्रिग्स 2-28 49) वि डीव्हीसीए: 90 षटकात 4बाद 533धावा (ओम भोसले नाबाद 196(198,21×4,3×6), मिझान सय्यद नाबाद 105 (120,12×4,2×6), किरण मोरे 92(88,10×4,5×6), यश 56 (66,104×4) , अंश धूत 62(72,6×4,1×6), शंतनू ढगे 1-39, यशवंत काळे 1-95); डीव्हीसीएने पहिल्या डावात 346 धावांची आघाडी घेतली;
दुसरा डाव : पुना क्लब : 44 षटकात 7बाद 255धावा(अखिलेश गवळे नाबाद 102(108,16×4), आर्यन गाडगीळ 29, देव नवले 27, शंतनू ढगे 22, शिवम ठोंबरे नाबाद 17, अॅलन रॉड्रिग्स 2-47, सूरज गोंदे 2-42 -58, मनोज यादव 2-54) वि.डीव्हीसीए; सामना अनिर्णित; डीव्हीसीए पहिल्या डावातील आघाडीवर विजयी.
बारणे क्रिकेट अकादमी मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 46.2 षटकात सर्वबाद 258धावा (अतुल विटकर 79(77,14×4), वैभव विभूते 60(60,12×4), नकुल काळे 24, ऋषिकेश बारणे 24, सिद्धेश वरघंटे 3-26, निलय शिंगवी 2-21, रझिक फल्लाह 2-23, शुभम खरात 2-55) वि.केडन्स: 82 षटकात 7बाद 418धावा(डाव घोषित) (अर्शिन कुलकर्णी 227 (203,28×4,5×6), अजिंक्य गायकवाड 60 (81,9×4), हृषिकेश मोटकर 37, सिद्धेश वारघंटे 23, अनिरुद्ध साबळे नाबाद 24, आर्य जाधव 16, वैभव विभुते 4-118); सामना अनिर्णित; पहिल्या डावाच्या आघाडीवर केडन्स विजयी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत बालाजी, जीवन नेदुंचेझियन उपांत्य फेरीत दाखल
क्रिकेटमधील खरेखुरे जंटलमन, ‘त्या’ एका कृतीने कपिल देव जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले