पुणे । आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत सिनेक्रोन संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा तर स्प्रिगर नेचर संघाने व्हेरीटास संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात कार्तिक हिरपाराच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर सिनेक्रोन संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा 59 धावांनी दणणात पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना कार्तिक हिरपाराच्या झंजावाती फलंदाजीच्या बळावर सिनेक्रोन संघाने 20 षटकात 5 बाद 201 धावांचा डोंगर रचला. कार्तिकने 22 चौकार व 2 षटकांसह केवळ 70 चेंडूत दमदार 123 धावा केल्या.
201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद जोशी व प्रतिक पांडा यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अर्न्स्ट अँड यंग संघ चार चेंडू बाकी असताना सर्वबाद 142 धावांत गारद झाला. 70 चेंडूत 123 धावा करणारा कार्तिक हिरपारा सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत जयप्रकाश शिरोळेच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर स्प्रिगर नेचर संघाने व्हेरीटास संघाचा 3 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
सिनेक्रोन – 20 षटकात 5 बाद 201 धावा(कार्तिक हिरपारा 123(70), विश्वजीत उधान 2-24) वि.वि अर्न्स्ट अँड यंग- 19.2 षटकात सर्वबाद 142 धावा(झुबेर हसन 32(25), चिन्मय जोशी 37(24),जमीर शेख 21-3, हर्षद जोशी 3-27, प्रतिक पांडा 2-13) सामनावीर- कार्तिक हिरपारा
सिनेक्रोन संघाने 59 धावांनी सामना जिंकला.
व्हेरीटास- 20 षटकात 8 बाद 96 धावा(सुमित दिघे 21(34), सुशांत मुळे 23(21), जयप्रकाश शिरोळे 3-9) पराभूत वि स्प्रिगर नेचर- 16 षटकात 7 बाद 97 धावा(राहुल नगाडे 46(47), सुमित दिघे 5-13) सामनावीर- जयप्रकाश शिरोळे
स्प्रिगर नेचर संघाने 3 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक