लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आघाडी घेण्याची समान संधी आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली आहे. दरम्यान, या कसोटी सामन्यात आजवर कसोटी क्रिकेटमध्ये न घडलेला विक्रम झाला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अनेक उतार-चढाव पाहायला मिळाले आहेत. दोन्ही संघांकडून जोरदार संघर्ष पाहायला मिळाला आहे. दरम्यान, या सामन्यात आजवर कसोटी क्रिकेटमध्ये न घडलेला विक्रम झाला आहे. या सामन्यातील चारही डावात मिळून एकूण ४ फलंदाज ५० धावांवर बाद होऊन माघारी परतले आहेत.
सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली, दुसऱ्या डावात ख्रिस वोक्स, तिसऱ्या डावात रिषभ पंत तर चौथ्या डावात रॉरी बर्न्स ५० धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम होण्याची पहिलीच वेळ आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीने ९६ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली होती. त्याला ऑली रॉबिन्सनने बाद केले होते. तसेच ख्रिस वोक्सने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ताबडतोड ५० धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो धावबाद होऊन माघारी परतला होता.
तसेच तिसऱ्या डावात रिषभ पंतने ५० धावांची खेळी केली होती. ही खेळी आणखी पुढे नेणार इतक्यात मोईन अलीने त्याला बाद करत माघारी धाडले होते. तर सामन्याच्या शेवटच्या दिवशी रॉरी बर्न्स ५० धावा करत माघारी परतला.(History created at oval,4 batsman score 50 runs in each inning of test match)
या सामन्यातील चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर) शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत या दोंघानी मिळून महत्वाची शतकी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले होते. शार्दुलने या डावात ६० तर रिषभ पंतने ५० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४६६ धावांचा डोंगर उभारता आला होता. यासह भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे आऊट ऑफ फॉर्म आहे, म्हणून नव्हे तर ‘या’ कारणामुळे रवींद्र जडेजाला मिळाली ५ व्या क्रमांकावर बढती
“तो असायला हवा होता”, चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने चाहत्यांना आली अश्विनची आठवण






