विजय हजारे ट्रॉफी 2018-19 स्पर्धा कालपासून सुरु झाली. पहिल्या फेरीचे सामने संपले आणि आजपासून दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरवात झाली.
झारखंड आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात झारखंडच्या संघाने राजस्थानवर 7 विकेटने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला झारखंडचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम. त्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
‘अ’ दर्जाच्या सामन्यातील हा विक्रम त्याने चेन्नईतील मुरुगप्पा येथे झारखंड विरूध्द राजस्थान यांच्यात दुसऱ्या फेरीच्या सामन्यात झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. त्याने या सामन्यात आपल्या 10 ओव्हर मध्ये केवळ 10 धावा देत 8 फलंदाजांना तंबुत परत पाठवले. त्यामुळे राजस्थान संघाचा डाव 73 धावांवर आटोपला. हे सोपे आव्हान झारखंडच्या संघाने 3 विकेट गमावत पूर्ण केले.
नदीमने सर्वात कमी धावा देत 8 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अश्या प्रकारची कामगिरी सर्वात आधी वेस्ट इंडीजचा केथ बायोसने केली होती. 1971 मध्ये त्याने 26 धावा देत 8 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर भारताच्या आरएल सांघवी यानी 1997 मध्ये 15 धावांत 8 विकेट मिळवल्या होत्या.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वासने 2001 मध्ये झिम्बाब्वे ‘अ’ विरूध्द वनडे सामन्यात 19 धावांत 8 विकेट मिळवल्या आहेत. त्यानंतर जवळ-जवळ 17 वर्षांनी नदीमने हा विक्रम मोडला आहे.
शहबाज नदीम सध्या अफलातून गोलंदाजी करत आहे. त्याने 2015-16 आणि 2016-17 रणजी ट्रॉफी सत्रात 50 पेक्षा जास्त बळी घेतले होते.
इतिहास घडला तोही भारतीय गोलंदाजाकडून🇮🇳
वनडे क्रिकेटच्या (अ दर्जाच्या ) इतिहासात आजपर्यंतचा सर्वोत्तम स्पेल
८/१०- शाहबाज नदीम,आज, राजस्थान वि झारखंड
८/१५- आरएल शांघवी, १९९७-९८
८/१९- चामिंडा वास, २००१-०२#ShahbazNadeem#VijayHazareTrophy #म #मराठी pic.twitter.com/AYE1Ndcn7d— Sharad Bodage (@SharadBodage) September 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर
–एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?