---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास: कशी झाली सुरुवात आणि का खेळतात फक्त आठ संघ?

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2025 6:27 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी चे महत्व कोणत्या वर्ल्ड कप पेक्षा कमी नाहीये, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील जगातील सर्वश्रेष्ठ संघ सहभागी होतात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. साल 2025 हे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे नववे वर्ष आहे. या 8 वेळा आयोजन केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असे आहेत ज्यांनी दोन वेळा ट्रॉफी आपल्या नावी केली आहे. पण फारच कमी लोकांना माहिती असेल की, चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात नेमकी कशी झाली. या स्पर्धेसाठी संघांची निवड कशी होते? आणि नेहमी 8 च संघ या स्पर्धेत का भाग घेतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 साली केली, परंतु या पूर्वी नॉकआऊट ट्रॉफी अशी या स्पर्धेची ओळख होती. 1998 मध्ये झालेल्या नॉकआऊट ट्रॉफी मध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. 2000 साली या स्पर्धेचे नाव बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी असे करण्यात आले. आत्तापर्यंत 8 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलिया ने दोन वेळा ट्रॉफी स्वतःच्या नावी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघांनी प्रत्येकी एक वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

1998 मध्ये स्पर्धेचा फॉरमॅटंच असा बनवला गेला की, संघाचा पहिला सामनाच क्वार्टरफायनल होता. स्पर्धेत 9 संघांनी सहभाग घेतला होता. पण प्रीलिमनरी सामन्यात झिम्बाब्वे संघाला हरवून न्युझीलंड संघ क्वार्टरफायनलमध्ये पात्र झाला होता. यानंतर नॉकआऊट स्पर्धेचे नाव बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी असे जरी करण्यात आले असेल, तरी फॉरमॅट मात्र तसाच राहिला.

महत्वाच्या बातम्या : 

“आता पाकिस्तानचे आतिथ्य संपूर्ण विश्व अनुभवेल.” रमिझ राजांचे ठळक वक्तव्य !

क्रिकेट चाहत्यांसाठी गिफ्ट! चॅम्पियन्स ट्रॉफीची सर्व माहिती आणि वेळापत्रक एका क्लिकवर!

“रोहित शर्माच्या विनोदबुद्धीचा मास्टरस्ट्रोक, जडेजाच्या प्रश्नावर दिले हटके उत्तर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---