---Advertisement---

टीम इंडियाचा नवा ‘चाणक्य’ कर्णधार रोहित शर्मा! केलाय धोनीलाही न जमलेला पराक्रम

Rohit-Sharma
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पडला. या विजयासह भारताने उपांत्य सामन्यात धडक तर दिलीच, पण त्याचसोबत कर्णधार रोहितच्याही नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 71 धावांनी आपल्या खिशात घातला. या विजयासह त्याने भारतीयांची छाती गर्वाने फुगवली. त्याचं झालं असं की, रोहितने हा सामना जिंकताच, तो एका आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडून बनला. झिम्बाब्वेविरुद्धच्या हा 2022मधील 21वा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील विजय होता.

रोहितआधी हा पराक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने करून दाखवला होता. त्याने 2021 या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 20 टी20 सामने जिंकले होते. या यादीत तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचाच माजी कर्णधार सर्फराज अहमद आहे. सर्फराजने 2018 या कॅलेंडर वर्षात एकूण 17 टी20 सामने जिंकले होते. या यादीत शेवटच्या स्थानी भारतीय संघाचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी याचा समावेश आहे. धोनीने 2016 या कॅलेंडर वर्षात भारताला एकूण 15 टी20 सामने जिंकून दिले होते.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारे कर्णधार
21 वेळा- रोहित शर्मा (2022)*

20 वेळा- बाबर आझम (2021)
17 वेळा- सर्फराज अहमद (2018)
15 वेळा- एमएस धोनी (2016)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेविरुद्ध पहिली ओव्हर संपताच ‘स्विंग किंग’ भुवीच्या नावे दोन मोठे विक्रम, बातमी वाचाच
अविश्वसनीय! विराटने घेतला झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा अफलातून कॅच, व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---