fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

राष्ट्रीय हॉकीत आजपासुन काट्याच्या लढती, उपउपांत्यफेरीच्या सामन्यांमध्ये भिडणार आठ संघ

औरंगाबाद। हॉकी हरियाणा आणि हॉकी चंडीगड संघासह अन्य सहा संघांच्या साथीने सोमवार (25 फेब्रुवारी) पासुन उपउपांत्य फेरीच्या लढती सुरु होणार आहेत. काट्याच्या लढतींसाठी देशातील अव्व्ल आठ संघ सज्ज झाले असुन भारतीय खेळ प्राधिकरण (साई) च्या मैदानावर अव्वल टीम एकमेकांशी दोन हात करणार आहे. अत्तापर्यंत झालेल्या चाळीस सामन्यांमध्ये हॉकी हरियाणा आणि हॉकी चंडीगड संघाने अ आणि ब गटात अव्वल स्थान पटकावले नसले तरी त्याची कामगिरी मात्र अव्व्ल आहे. अत्तापर्यंत 180 गोल झालेल्या या स्पर्धेत चंडीगडने सर्वाधिक सरासरीने अर्थात 4.5 गोल प्रतिसामना केला आहे. त्यांनी सर्वाधिक 20 तर त्यांच्यापाटोपाठ हॉकी पंजाबने 17, हॉकी हरियाणाने 15 गोल केले आहेत.

116 फिल्ड गोल पैकी 55 गोल हे पेन्ल्टी कॉर्नरमधुन आले असुन हॉकी चंडीगडने सर्वाधिक 13 गोल पेनल्टी कॉर्नरमधुन केले आहेत. हॉकी पंजाबने 12, तर हॉकी हरियाणाने सहा पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत केले आहे.

दुसरीकडे हॉकी हरियाणा संघानेही काही उपलब्धी आपल्या भात्यात मिळवल्या आहेत. त्यांनी मणिपुरला 7-0 च्या फरकाने मात दिली आहे. त्यांनी सगळे सामने सर्वाधिक गुणफरकाने जिंकले आहेत, याची नोंद घ्यावी लागेल. सात गोल करणारे अजुन दोन संघ या स्पर्धेत अस्त्वि कायम राखुन आहेत. त्यात उत्तरप्रदेश आणि हॉकी चंडीगड यांचा समावेश आहे.

या झालेल्या चाळीस सामन्यांपैकी सहा सामने हे ड्रॉ झाले आहेत, तर उर्वरित सगळे सामने निकाली निघाले आहेत. विशेष म्हणजे 100 खेळाडूंनी हे 180 गोल केले आहेत. हॉकी चंडीगड आणि हॉकी पंजाबतर्फे प्रत्येकी नऊ जणांनी गोल केले आहेत, हॉकी हरियाणाच्या सात तर उत्तरप्रदेश हॉकीतर्फे सहा जणांनी सातत्याने गोल केले आहेत.

स्पर्धेचा अन्य लेखा जोखा
सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड, द मुंबई हॉकी असोसिएशन आणि पंजाब ऍण्ड सिंध बॅंक या संघांनी स्पर्धेत एकही विजय सकारला नाही. एसएससीबीने 20 गोल स्विकारले. मुंबईसाठी हा आकडा 17 वर राहिला. दुसरीकडे पंजाब ऍण्ड सिंध बॅंक संघाला एकही कार्ड मिळालेले नाही. त्यांनी स्पर्धेत सर्वात कमी अर्थात 3 गोल केले आहेत.

तीन हॅट्रीकचा धमाका
साखळी सामन्यांमध्ये झालेल्या लढतींमध्ये तीन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीकरत हॅट्रीकचा बार उडवुन दिला. त्यात नबीन कुंजर (स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड) ने 4 सलग गोल केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रच्या आमिद खानने हॉकी कर्नाटकाच्या विरोधात सलग तीन गाले ठोकले होते. याशिवाय हिमाचल हॉकीच्या वाशू देवने सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्डच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात तीन गोल ठोकले होते.

स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारे:
7: एस. कार्थी (तामिळनाडूचा हॉकी संघ)
6: नबीन कूंजर (स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड)
5: गोपी सोनकर (उत्तरप्रदेश हॉकी)

फिल्ड गोल करणारे खेळाडू:
4: एस कार्थी, गोपीकुमार सोनकर, मोहम्मद अलीशान (मध्यप्रदेश हॉकी अकादमी), वाशू देव (हॉकी हिमाचल), सुदर्शन सिंग (हॉकी पंजाब).

सर्वाधिक पेनल्टी कॉर्नर:
5: नबीन कूंजर
4: हाशिम (हॉकी चंडीगड), प्रतिक शर्मा (हॉकी पंजाब)

You might also like