पुणे, 21 जुलै 2024: हॉकी महाराष्ट्रने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवत राजनांदगाव, छत्तीसगड येथे सुरू झालेल्या दुसऱ्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला वेस्ट झोन स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली.
शेवटच्या मिनिटांत अर्जुन हरगुडेने केलेल्या गोलमुळे हॉकी महाराष्ट्र मुले संघाने यजमान छत्तीसगड हॉकीचा 5-4 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. कार्तिक पठारेचे 3 तर गौरव पाटीलने एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
आदल्या दिवशी हॉकी महाराष्ट्राच्या मुलींनी सानिका मानेच्या (५ गोल) सर्वोत्तम गोलांच्या जोरावर गोवन्स हॉकीचा १३-० असा धुव्वा उडवला. सुकन्या धावरे, तनुश्री कडू, सावित्री बोरगल्ली (प्रत्येकी २ गोल), खुशी, अस्मिता घोटलेची (प्रत्येकी १ गोल) तिला चांगली साथ लाभली.
निकाल :
मुले – हॉकी महाराष्ट्र: 5 (कार्तिक पठारे 4′, 35′, 43′ – पीसी, गौरव पाटील 21′ – पीसी; अर्जुन हरगुडे 60′) विजयी वि. छत्तीसगड हॉकी: 4 (महावीर वर्मा 28′ – पीसी; आनंद सूर्यवंशी 44′ – पीसी; मोहित नायक ४८’, ५५’ – पीएस). हाफटाईम: 3-0
मुली –
हॉकी महाराष्ट्र: 13 (खुशी 4′ – पीसी; सुकन्या धावरे 6′, 9′- पीएस; सानिका माने 7′, 22′ – पीसी, 27 – पीसी, 50′, 51′; अस्मिता घोटाळे 15′; तनुश्री कडू 20′ , 39′; सावित्री बोरागल्ली 24′, 56′) विजयी वि. गोवन्स हॉकी: 0. हाफ टाईम: 9-0
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावून रुटनं केली ‘या’ दिग्गज खेळाडूंची बरोबरी
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबद्दल आकाश चोप्रानं दिली प्रतिक्रिया
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय खेळाडूंसाठी मदतीची घोषणा