पुणे। हॉकी जळगाव, औरंगाबाद आणि उस्मानाबाद संघांनी राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. हे तीनही संघ आता गेल्यावर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या रायगड, नांदेड, पुणे आणि कोल्हापूर संघांना येऊन मिळतील. या चार संघांने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला होता.
ही स्पर्धा पिंपरी-नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे. औरंगाबाद संघाने आपला धडाका कायम राखताना धुळे संघावर ६-२ असा विजय मिळविला. यात मोहित काथोटे याने दोन गोल नोंदवले.
पहिल्या तीन मिनिटांतच दोन गोल करून औरंगाबादने सामन्याची दोरी आपल्या हातात ठेवली. राज पवारने दुसऱ्या, हर्ष काथोटेने तिसऱ्या आणि मोहितने पाचव्या मिनिटाला गोल केला. मोहितने त्यांनी पंधराव्या मिनिटाला गोल करून मध्यंतरालाच औरंगाबादने ४-० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर ओम चांगले याने ४३, आकाश जमदाडेने ४८व्या मिनिटाला गोल करून आघाडी ६-० अशी वाढवली. पण, अखेरच्या मिनिटांत त्यांनी दोन मिनिटात दोन गोल स्वीकारले. सोहेल शेखने ५२ आणि ५४ व्या मिनिटाला हे गोल केले.
त्यानंतर उस्मानाबाद संघाने सोलापूरचा १०-३ असा पराभव केला. यात त्यांचा सात खेळाडूंनी गोल केले. झिशान शेखने ७ आणि ४०, स्वप्नील गरसुंडने ९, ३९, अईफाज सय्यदने १२ आणि ५७व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात आपला प्रमुख वाटा उचलला. त्यानंतर मोहसीन मुल्ला १९, संतोष कस्तुरे, करण दुर्गा आणि मुसा तोर्गल ६०वे मिनिट यांनी एकेक गोल करून आपले योगदान दिले. उत्तरार्धात नरसप्पा भोसले, अजय मोरे, संकेत मासुटे यांनी सोलापूरसाठी एकेक गोल केला.
आजच्या दिवसातील अखेरच्या सामन्यात जळगावने सांगलीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये ३-२ असा विजय मिळविला. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.
हॉकी नंदुरबार आणि नगर संघा दरम्यान होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरी गाठणारा चौथा संघ असेल.
निकाल –
उपउपांत्यपूर्व फेरी:
हॉकी जळगाव 1, 3 (मोहसीन शेख 58वे; फराज तडवी, अकबर खान, नदीम कुरेशी) वि.वि. हॉकी सांगली: 1,2 (पंकज पाटील 11वे; पंकज पाटील, सभूराज शिंदे)
हॉकी औरंगाबादः ६ (राज पवार दुसरे, हर्ष कथोटे तृतीय; मोहित कथोटे ५वे, १५वे; ओम चांगले ४३वे; आकाश जमधाडे ४८वे) वि.वि. हॉकी धुळे: २ (सोहेल शेख ५२वे, ५४वे);
हॉकी उस्मानाबाद: 10 (झिशान शेख 7वे, 40वे; स्वप्नील गरसुंड 9वे, 39वे ऐफाज सय्यद 12वे 57वेमोहसीन मुल्ला 19वे संतोष कस्तुरे 20वे; करण दुर्गा 27वे मुसा तोरगळे 40वे मुसा बंगला 40वे तोरगाले 40वे.) वि.वि. हॉकी सोलापूर ३ (मोरे ४३वे; संकेत मसुते ५३वे).
पहिली फेरी –
हॉकी अहमदनगर: 10 (जय शिंदे 5वे अजिंक्य निकाळजे 9वे, 21वे, 25वे अविनाश बानगर 36वे आशिष कात्रज 44वे, 55वे, 66वे आकाश डेलीटकर 57वे हुसेन तडवी 60वे) वि. वि. लातूर
हॉकी जळगाव: 6 (पराग तडवी 14वे, 20वे, 49वे शारिक सय्यद 15वे, आरिफ शेख 23वे, मोहसीन शेख 25वे) वि.वि. हॉकी नाशिक: 1 (यश्रक खेमनार 50वे)
हॉकी सांगली: 1 (रोहित कदम 36वे) वि.वि. हॉकी अमरावती जिल्हा: 0
हॉकी लातूर: 2 (अभिषेक माने 24वे; विनोद उपाडे 35वे) वि.वि. बीड जिल्हा हॉकी संघटना: 1 (प्रथम अंगीर 23वे)
महत्त्वाच्या बातम्या –
वरिष्ठ राज्य हॉकी अजिंक्द स्पर्धा २०२१: उस्मानाबाद, औरंगाबाद संघांचे सहज विजय
राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुण्यात राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका
मुलांच्या हॉकी स्पर्धेत रोख रक्कमेच्या पुरस्कारात भरघोस वाढ, विजेत्या संघाला मिळणार रोख १ लाख रूपये