---Advertisement---

राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुण्यात राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 11:29 AM
---Advertisement---

पुणे| पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेपूर्वी पुणेकरांना आजपासून (ता. ७) राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका अनुभवयाला मिळणार आहे.

या स्पर्धेत २१ जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. गतविजेता पुणे आणि उपविजेता कोल्हापूर संघ स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहतील. महाराष्ट्र देखिल राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करू शकतो हे आम्ही हॉकी इंडियाला दाखवून देऊ. त्यापेक्षा आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडताना पर्यायी खेळाडूंची भक्कम फळी या स्पर्धेने उपलब्ध होईल, असे हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे यांनी सांगितले.

पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला रविवारपासून सुरवात होणार आहे. पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि रायगड यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा बाद फेरीने खेळविण्यात येणार आहे. औरंगाबाद, जालना, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद, जळगांव, नाशिक, सांगवली, अमरावती, नंदुरबार, रायगड, नांदेड, बीड, लातूर, सिंधुदुर्ग, नगर, धुळे, अकोला, सातारा हे अन्य जिल्हे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेदरम्यानच मुंबई, विदर्भ आणि शेष महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी खुली चाचणी १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन चार वेळचा ऑलिंपियन हॉकीपटू धनराज पिल्ले याच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष मनिष आनंद उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला पुणे संघ – अब्दुल सलमानी, प्रणव माने, रोमेश पिल्ले, राहुल रसाला, तालेब शाह, ओमकार मुसळे, अजय मोरे, अथर्व कांबळे, रितेश पवार, गुफरान शेख, योगेश बोरकर, राहुल शिंदे, मोहन पाटील, रेझी मुजावर, हरिष शिंदगी, वेंकटेश केंची, प्रज्वल मोहरकर, सौरभ पाटील, गणेश पाटील, सतिष पाटील, नवज्योत सिंग, किरण मोहिते (यष्टिरक्षक), रॉकसन बॉस्को (गोलरक्षक), जीवन शिंदे (गोलरक्षक)

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रावोसह ‘या’ विंडीज क्रिकेटरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

पाकिस्ताननंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट; चौथ्या स्थानासाठी भारतासह ‘हे’ २ संघ शर्यतीत

तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---