पुणे। हॉकी उस्मानाबाद आणि औरंगाबाद संघांनी वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत अपेक्षित सुरवात केली. हॉकी महाराष्ट्राने आयोजित केलेल्या या स्पर्धेला आज पिंपरी-नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर स्पर्धेला सुरवात झाली.
उस्मानाबाद संघाने एकतर्फी लढतीत हॉकी रत्नागिरीचा १०-१ असा दणदणीत पराभव केला. अईाफाज सय्यद (२३ आणि ४१वे मिनिट), मिसा (१० आणि ४६वे मिनिट) आणि मोहिन मुल्ला (५६ आणि ५९ मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. झिशान शेखयाने चौथ्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर तोरगल, स्वप्नील गुरसंड, निहाल गोरटकर आणि अईफाज यांनी गोल करून उस्मानाबाद संघाला मध्यंतराला ५-० असे आघाडीवर नेले होते. त्यानंतर उत्तरार्धात उस्मानाबाद यांनी आणखीन पाच गोल केले. रत्नागिरीने ऋषिकेश अतकरी याने ३९व्या मिनिटाला एकमात्र गोल केला.
त्यानंतर हॉकी औरंगबाद संघाने मोहित काथोटे याने ३३ आणि ४९व्या मिनिटाला केलेल्या दोन गोलच्या जोरावर हॉकी सातारा संघाचा ५-३ असा पराभव केला. रिझवान शेख याने १८व्या मिनिटाला औरंगबादला आघाडीवर नेले. पाठोपाठ सहा मिनिटांनी विनय नेरकर याने २४व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सातारा संघाला बरोबरीवर नेले. पुढे जाऊन मोहितने दोन पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावून औरंगाबादला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राज पवार आणि करण ठोसरे यांनी गोल करून औरंगबादचा विजय साकार केला. अर्थात, त्यापूर्वी अखेरच्या दोन मिनिटाला दोन गोल करून सातारा संघाने गोलफरक कमी करण्याचे काम केले. निशांत गायकवाडने ५८, तर प्रतिक झझाने याने ६०व्या मिनिटाला गोल केले.
स्पर्धेचे उदघाटन ऑलिंपियन डॉ. धनराज पिल्ले यांच्या हस्ते झाले. या वेळी हॉकी पुणेचे अध्यक्षत्र आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेश आनंद, ऑलंपियन अजित लाक्रा, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे उपस्थित होते.
निकाल (दिवस 1)
हॉकी उस्मानाबाद: १० (झिशान शेख ४थे; तोरगल मुसा १०वे, ४६वे; स्वप्नील गरसुंद १६वे; निहाल गोरटकर २०वे; ऐफाज सय्यद २३वे;, ४१वे; फिरोज सय्यद ४४वे; मोहीन मुल्ला ५६वे; बृत्त्रिकाय ३९वे;)
हॉकी असोसिएशन ऑफ औरंगाबादः ५ (रिजवान शेख १८वे; मोहित कथौते ३३वे, ४९वे; राज पवार ३६वे; करण ठोसरे ५१वे) बीटी द हॉकी सातारा: ३ (विनय नेरकर २४वे; निशांत गायकवाड ५८वे; प्रतिक ६०वे).
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुण्यात राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचा धमाका
मुलांच्या हॉकी स्पर्धेत रोख रक्कमेच्या पुरस्कारात भरघोस वाढ, विजेत्या संघाला मिळणार रोख १ लाख रूपये