हॉकी विश्वचषक 2023च्या स्पर्धेची घोषणा झाली आहे. पुरूष संघाची ही स्पर्धा ओडीसा, भारत येथे खेळली जाणार आहे. याचे सामने कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर आणि बिरसा मुंडा स्टेडियम, रूरकेला येथे खेळले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळणार आहेत. चार संघांचे प्रत्येकी चार गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. तर भारताचा समावेश ड गटात आहे. भारतासोबत या गटामध्ये इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघाचा समावेश आहे.
भारतीय संघ जागतिक क्रमावारीत पाचव्या स्थानावर आहे. गट ड मध्ये इंग्लंड, दोन वेळेचा रौप्य पदक विजेता स्पेन आणि वेल्स हे संघ भारताशी भिडणार आहेत. स्पेन हा जागतिक क्रमवारीत 16व्या स्थानावर आहे. तर वेल्स पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. भारताला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
तसेच गतविजेचा बेल्जियम ब गटात आहे. या गटामध्ये त्यांच्याबरोबर जर्मनी, कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया अ गटात असून त्यामध्ये अर्जेंटीना, फ्रांस आणि दक्षिण आफ्रिका आहेत. ही स्पर्धा 13 जानेवारी 2023 पासून ते 29 जानेवारी 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच क गटात नेदरलॅण्ड्स, चिली, न्यूझीलंड आणि मलेशिया या संघांचा समावेश आहे.
The DRAW is set in stone, and we will have England, Spain, and Wales as our companion in Pool D for the FIH Odisha Hockey Men's World Cup 2023 Bhubaneswar-Rourkela.
Share your thoughts on the draw. 👇 pic.twitter.com/lijw7zVhmq
— Hockey India (@TheHockeyIndia) September 8, 2022
पुढील वर्ष म्हणजेच 2023 वर्ष हॉकी विश्वासाठी महत्वाचे असणार आहे. त्यातच हा 15वा विश्वचषक भारतात होत असल्याने संघाच्या जिंकण्याच्या आशा आहेत. भारताने 1975मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तर सर्वाधिक विश्वचषक पाकिस्तानच्या हॉकी संघाने जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर नेदरलॅण्ड्सने तीनवेळा विश्वविजेतेपद जिंकले आहेत.
भारताच्या हॉकी संघात मागील काही वर्षापासून उत्तम बदल पाहायला मिळाले आहे. भारताने 2020 टोकीयो ऑलिम्पिकचे कांस्य पदक जिंकले. 1980नंतर प्रथमच भारताने ऑलिम्पिकचे पदक जिंकले होते. तसेच 2022मध्ये बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सचे रौप्य पदक पटकावले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नसीम शाहमूळे शास्त्रींना आठवला 36 वर्षापूर्वीचा ‘तो’ सामना; बाबरला म्हणाले थँक्यू
मानलं भज्जी पा! विदेशात ओलीस ठेवलेल्या भारतीय मुलीची सुटका; कौतुकाचा होतोय वर्षाव
गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या वॉशिंग्टनला आईने दिले फटके, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल