टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि अर्जेंटिना संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी रियो ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिना संघावर ३-१ ने विजय मिळवला आहे. यासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे.
विशेष म्हणजे सामना सुरू होऊन ८ मिनिटे झाली असतानाही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. दोन्हीही संघात काट्याची टक्कर सुरू होती. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. दुसरा क्वार्टर संपायला ५.५३ मिनिटे बाकी असूनही या सामन्यात दोन्ही संघांकडून एकही गोल करता आला नव्हता. पहिला हाफ संपल्यानंतरही स्कोर ०-० असाच होता. यादरम्यान भारताला बऱ्याच संधी मिळाल्या. मात्र, त्यांना गोल करता आला नाही. (Hockey Team India Won 3rd Match In Olympic Beat Argentina 3-1)
Now, that's how we start our day. 🇮🇳
Our third win of #Tokyo2020 and with that, we are guaranteed a top-two finish in Pool A. 💪#INDvARG #IndiaKaGame #HaiTayyar #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/dIJEpYZxbc
— Hockey India (@TheHockeyIndia) July 29, 2021
मात्र, जेव्हा तिसरा क्वार्टर सुरू झाला, तेव्हा ४३ व्या मिनिटाला भारतीय संघाने पहिला गोल केला. हा गोल पेनल्टी कॉर्नरमार्फत आला. हा गोल वरुण कुमारने केला होता. हा त्याचा ऑलिंपिकमधील पहिलाच गोल होता. यापूर्वी ४१ व्या मिनिटाला भारताला सामन्याचा पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. यादरम्यान रुपिंदर पाल सिंग गोल करण्यात अपयशी ठरला.
तिसऱ्या क्वार्टरनंतर अर्जेंटिनानेही पुनरागमन करत पहिला गोल केला आणि सामन्यात बरोबरी केली. हा गोल ४७ व्या मिनिटाला केला होता. हा गोल मायको कॅसेलाने पेनल्टी कॉर्नरमधून केला होता.
मात्र, त्यानंतर भारतीय संघाने आणखी एक गोल करत ३-१ ने आघाडी घेतली. हा गोल हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरमधून केला होता. यासह भारताने सामना खिशात घातला आहे आणि पुढच्या फेरीत पोहोचणे नक्की झाले आहे.
भारतीय हॉकी संघ ४ सामन्यात ९ गुण मिळवत पूल ए मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना