भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अ गटातील पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.
याआधी हे दोन्ही संघ विश्वचषकात 7 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील 3 सामने जिंकत स्पेन आघाडीवर आहे. तर 2 सामने अर्जेंटिनाने जिंकले असून 2 सामने अनिर्णीत राहिले होते.
2014च्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक 10 गोल करणारा आणि 2016च्या ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक 11 गोल करणारा ड्रॅग फ्लिकर पेईलाट गोंझेलोवर सगळ्यांची नजर असणार आहे. अर्जेंटिनाने 2014च्या विश्वचषकात कांस्य तर 2016च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
जागतिक क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर असणारा अर्जेंटिना याआधीच्या सगळ्या विश्वचषकात खेळला आहे. तसेच स्पेनही 1971 पासून सुरू झालेल्या विश्वचषकापासून सहभागी झाला आहे.
तसेच पेईलाटने यावर्षी झालेल्या अझलान शाह कपमध्येही पेनल्टी कॉर्नरवर सर्वाधिक 8 गोल केले. मात्र त्याच्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात अपयश आले होते. तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले होते.
जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर असणारा स्पेन 2006च्या कांस्यपदकाचा मानकरी ठरला असून 2008च्या बीजिंग ऑलिंपिकमध्येही रौप्यपदक पटकावले होते. 2014च्या विश्वचषकामध्ये त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
संघासोबत 2006च्या विश्वचषकापासून सोबत असणाऱ्या गोलकिपर कोरतेज किंक्को आणि एनरिक सेर्गी संघात आहे. तसेच स्पेनने तीनदा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला रियो ऑलिंपिकच्या साखळी फेरीत पराभूत केले आहे.
आजच्या सामन्यात पेईलाट की एनरिक सेर्गी यापैकी कोणाचा अनुभव चालणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अर्जेंटिनाचा संघ- इबारा पेड्रो (कर्णधार), विवाल्दी जुआन (गोलकिपर), पेईलाट गोंझेलो, गिलार्डी जुआन, ऑर्टीज इग्नासिओ, लोपेझ जुआन, पॅरेदेस मॅटीअस, मेनीनी जोक्कीन, विला लुकास, रे मॅटीस, मार्टीनेझ लुकास, मझील्ली ऑग्स्टीन, सीसीलिओ निकोलस, रोस्सी लुकास, बुगाल्लो ऑग्स्टीन, कॅसेल्ला माइका, बेट्टाग्लिओ थॉमस (गोलकिपर), सॅंटीनो थॉमस (गोलकिपर)
स्पेनचा संघ- डेलास मिगल (कर्णधार), कोरतेज किंक्को (गोलकिपर), एनरिक सेर्गी, सॅमचेज रिकोर्डो, सेराहिमा मार्क, रोडरिग्ज इग्नासिओ, गोंजालेज एनरिक, इग्लेसियास अल्वारो, सालेस मार्क, सानटाना रिकार्डो, अराना डियागो, लीयोनार्ट झावी, डे फ्रुटोस अलेजांड्रो, टोरास इग्नासी, गार्सीया मार्क, रुझ वसेंकबेक्टरॉन अल्बर्ट, रोमियो जोस्प, गॅरीन मारिओ (गोलकिपर), क्यंमडा पाऊ, बोल्ट मार्क
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर