fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात

भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकामधील आजच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य बेल्जियमने कॅनडाचा 2-1 असा पराभव करत विजयी सुरूवात केली.

कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सुरूवातीपासूनच बेल्जियमच्या खेळाडूंनी आक्रमक सुरूवात केली होती. त्यांच्या फेलिक्स डेनायरने 3ऱ्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

तर दुसऱ्या सत्रातही बेल्जियमने त्यांचे हल्ले सुरूच ठेवले. थॉमस ब्रिल्सने 22व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमची आघाडी कायम ठेवली. यावेळी या सामन्यात बेल्जियमला एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले होते.

तसेच बेल्जियमचा गोलकिपर वॅनश विन्सेंट याने या सामन्यात बहारदार कामगिरी करत संघाचा विजयाचा मार्ग निश्चित केला.

तिसऱ्या सत्रात कॅनडाच्या खेळाडूंनी चेंडूवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यांना या सामन्यात दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी एक पेनल्टीचा गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना यश आले.

सामना संपण्यास 12 मिनिटे बाकी असताना कॅनडाच्या मार्क पिअरसनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाचे खाते उघडले. शेवटचे काही मिनिटे बाकी असताना कॅनडाच्या खेळांडूनी सामना बरोबरीत आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले.

विश्वचषकात हे दोन संघ दुसऱ्यांदा आमने-सामने आले होते. पहिला सामना 2-2 असा बरोबरीत राहिला होता.

जागतिक क्रमवारीत बेल्जियम 3ऱ्या तर कॅनडा 11व्या स्थानावर आहे.

विकेटकीपर म्हणून पार्थिवच हवा, रिषभ पंत नकोच

किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान न मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा

भारताची आघाडीची महिला रेसर मिरा एरडा, स्नेहा शर्मा डब्ल्यु सिरिज ट्रायल्समध्ये नोंदवणार सहभाग

You might also like