---Advertisement---

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

---Advertisement---

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात क गटाचे सामने होणार असून पहिला सामना कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर येथे होणार आहे.

या दोन्ही संघाचे या विश्वचषकातील दुसरे सामने असून त्यांना पहिल्या विजयाची आशा आहे. कारण पहिल्या सामन्यात कॅनडाला बेल्जियम विरुद्ध 2-1 तर दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध 5-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

कॅनडाने जागतिक क्रमावारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेल्जियमविरुद्ध चांगला संघर्ष केला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेला भारताशी दोन हात करणे कठिण गेले होते. त्यामुळे हे दोन्ही संघ आजच्या सामन्यातून खेळ उंचवण्याच्या प्रयत्नात असतील.

जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 2014 च्या विश्वचषकात 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

ड्रुमॉँड टीम कर्णधार असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारताविरुद्धचा पराभव विसरुन आज कॅनडाचा सामना करावा लागणार आहे.

त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असणाऱ्या कॅनडाचा आत्मविश्वास बेल्जियमला दिलेल्या कडव्या प्रतिकारानंतर वाढला असेल. तसेच त्यांचा बेल्जियम विरुद्ध चांगला बचाव पहायला मिळाला होता. त्यामुळे ते दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व ठेवत पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 2013 पासून 8 सामने झाले आहेत. यातील 5 सामने दक्षिण आफ्रिकेने तर 2 सामने कॅनडाने जिंकले आहेत. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आहे. मात्र या दोन संघात विश्वचषकामध्ये आत्तापर्यंत एकही सामना झालेला नाही. त्यामुळे आता आज कोण पहिला 2018 च्या विश्वचषकात पहिला विजय मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज होणाऱ्या कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

दक्षिण आफ्रिका- ड्रुमॉँड टीम (कर्णधार), स्मिथ ऑस्टीन, ड्लुंग्वाना टायसन, विंबी ओवेन, लेमबेथ डुडुज्हो, हाइक्स जुलियन, हॅमॉंड थॉमस, होर्ने किनन, कॅसिम दयान, हॅलकेट ऱ्हेट, पॉट्झ रिचर्ड, जुलीयस रायन, डार्ट टायलर, पॅटॉन ट्रनी, मिआ मोहम्मद, लोव लान्स, युस्टस जेथ्रो, बेल डॅनियल, पिटर्स रस्सी (गोलकीपर), स्पॅनर निकोलस, टूली कोबीले, जोन्स गोवान (गोलकीपर)

कॅनडा- कार्टर डेव्हिड(गोलकीपर), बिसेट ब्रेंडन, हिल्डरेथ रिचर्ड, हो-गार्सीया गेब्रियल, जोन्सटन गोर्डन, किंडलर अँटोनी(गोलकीपर), किर्कपॅटिक जेम्स, पानेसर बलराज, पानेसर सुखी, पियर्सन मार्क, परेरा ब्रेंडन, परेरा किगन, सारमेंटो मॅथ्यू, स्कोलफिल्ड ऑलिव्हर, स्मिथ लेन, स्मिथ जॉन, टपर स्कॉट(कर्णधार), वाॅलेस जेम्स.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: अटीतटीच्या लढतीत जर्मनीचा चार वेळेचा विश्वविजेत्या पाकिस्तानवर विजय

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी

दुखापतीनंतर पृथ्वी शॉ जास्त बोलतही नाही, अश्विनने दिली माहिती

हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment