भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलॅंड्सने मलेशियावर 7-0 असा मोठा विजय मिळवला.
या सामन्यात नेदरलॅंड्सच्या जेरोइन हर्ट्झबेगरने हॅट्ट्रीक आणि प्रृईजर मिक्रो, मिंक वॅन देर विडे, केम्परमन रॉबर्ट यांनी प्रत्येकी एक गोल केला.
ड गटात झालेल्या या पहिल्या सामन्यात गतउपविजेता नेदरलॅंड्सने चांगली सुरूवात केली. त्यांच्या जेरोइन हर्ट्झबेगरने पहिल्या सत्रातच 12व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले.
तर दुसऱ्या सत्रात प्रृईजर मिक्रोने 21व्या मिनिटाला आणि 29व्या मिनिटाला हर्ट्झबेगरने या सामन्यातील दुसरा गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या नेदरलॅंड्सचा तिसऱ्या सत्रात चेंडूवर सर्वाधिक ताबा होता. तसेच त्यांचा गोलकिपर ब्लॅक पिरमिननेही उत्तम कामगिरी केली.
अनुभवी ड्रॅग फ्लिकर मिंक वॅन देर विडेनही संघात परत येत साजेसा खेळ केला. त्याने 35व्या मिनिटाला गोल केला. तर नेदरलॅंड्सकडून 200वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या केम्परमन रॉबर्टने 42व्या मिनिटाला गोल करत संघाला 5-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
ब्रिंकमन थिएरीने 57व्या मिनिटाला नेदरलॅंड्सकडून सहावा गोल केला. तर सातवा गोल सामना संपण्यास 8 सेकंद बाकी असताना हर्ट्झबेगरने करत या स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रीक केली.
या सामन्यात मलेशियाला धक्का देणारा हर्ट्झबेगर हा सामनावीर ठरला.
तसेच या दोन संघाचे पुढील सामने 5 डिसेंबरला आहे. यामध्ये नेदरलॅंड्स जर्मनी विरुद्ध आणि मलेशिया पाकिस्तान विरुद्ध लढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–८ वर्षांनी टीम इंडिया जिंकणार विश्वचषक, जाणून घ्या काय आहे कारण
–अष्टपैलू खेळाडू म्हणतो, विराटने सांगितले तर ओपनिंगही करेल
–२१२ वन-डे खेळलेला खेळाडू म्हणतो, कसोटी नकोच