भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात सहाव्या दिवशीची पहिला सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर येथे सुरुवात होईल.
अ गटात असलेल्या स्पेन आणि फ्रान्स दोन्ही संघांना या विश्वचषकात पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे याच इराद्याने हे दोन्ही संघ आज मैदानात उतरणार आहेत.
या विश्वचषकात या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात फक्त एका गोल फरकाने पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तो पराभव सलत असेल.
स्पेनला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अर्जेंटिनाने 4-3 असे पराभूत केले होते. तर फ्रान्सला न्यूझीलंडने 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे.
जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर असणाऱ्या स्पेनने बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली होती. डेलास मिगल कर्णधार असलेला स्पेनचा संघ पहिल्या सामन्यात विजयाच्या खूप जवळ येऊन पराभूत झाला आहे. त्यामुळे ते त्यांच्या पेक्षा कमी क्रमवारी असणाऱ्या फ्रान्सला सहज पराभूत करत या स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
त्यांच्या संघातील एन्रिक गोन्झालेज हा फ्रान्स संघासाठी धोकादायक ठरु शकतो. त्याचबरोबर स्पेनच्या संघांनी अर्जेंंटिना विरुद्ध मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा चांगला उपयोग केला होता. त्यांची अर्जेंटिना विरुद्ध संघकामगिरी महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे फ्रान्स संघाला त्यांचा चिकाटीने सामना करावा लागणार आहे.
तसेच 20 व्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्स संघानेही न्यूझीलंड विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यांच्या संघातील ड्रॅग फ्लिकर चारलेट विक्टरची कामगिरी या सामन्यात महत्त्वाची ठरेल.
तसेच 28 वर्षांनंतर विश्वचषकात खेळणाऱ्या फ्रान्स संघातील ह्यूगो आणि टॉम हे जेनस्टेट बंधू या मिल्डफिल्डर खेळाडूंवर तर पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असणारा विक्टर चार्ल्सवरही सर्वांचे लक्ष असेल.
त्यांमुळे आता आज कोणता संघ या विश्वचषकातील पहिला विजय मिळवून आव्हान कायम ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आज होणाऱ्या स्पेन विरुद्ध फ्रान्स सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
फ्रान्स- चारलेट विक्टर (कर्णधार), विक्टर चार्ल्स, बामगर्टन गॅस्पर्ड, ब्रॅन्की मॅक्सिमिलियन, क्लेमेंट टिमोथी, कोसिने एरिस्टाइड, डॅमंट निकोलस, जीन-बॅप्टिस्ट फर्ग्युस, ह्यूगो जेनस्टेट टॉम जेनस्टेट, गोएत फ्रान्कोइस, लॉकवुड व्हिक्टर, मॅसन चार्ल्स, पेटर्स-डीयूट्झ क्रिस्टोफोरो, रॉगेयू ब्लेज, सौनियर कोरेन्टिन(गोलकिपर), थिफ्री आर्थर (गोलकिपर), टायनेवेझ इतियेन, वॅन स्ट्रॅटन पीटर.
स्पेनचा संघ- डेलास मिगल (कर्णधार), कोरतेज किंक्को (गोलकिपर), एनरिक सेर्गी, सॅमचेज रिकोर्डो, सेराहिमा मार्क, रोडरिग्ज इग्नासिओ, गोंजालेज एनरिक, इग्लेसियास अल्वारो, सालेस मार्क, सानटाना रिकार्डो, अराना डियागो, लीयोनार्ट झावी, डे फ्रुटोस अलेजांड्रो, टोरास इग्नासी, गार्सीया मार्क, रुझ वसेंकबेक्टरॉन अल्बर्ट, रोमियो जोस्प, गॅरीन मारिओ (गोलकिपर), क्यंमडा पाऊ, बोल्ट मार्क
महत्त्वाच्या बातम्या: