हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्यास स्पेन उत्सुक तर न्यूझीलंडचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6 डिसेंबर) अ गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना स्पेन विरुद्ध न्यूझीलंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.

या दोन्ही संघाचा या विश्वचषकातील हा तिसरा सामना असून न्यूझीलंडने फ्रान्सवर 2-1 असा एक विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यात त्यांना अर्जेंटिनाकडून 0-3 असा मोठा पराभव स्विकारावा लागला. तसेच स्पेनला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यांना पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाकडून 4-3 आणि फ्रान्स विरुद्ध 1-1 असे बरोबरीत समाधान मानावे लागले.

स्पेन आणि न्यूझीलंड हे दोघे विश्वचषकात याआधी सात वेळा खेळले असून आज ते आठव्यांदा समोरा-समोर येणार आहे. यामध्ये 4 विजय स्पेनच्या नावावर तर 3 विजय न्यूझीलंडच्या नावावर आहेत. तसेच 2013 पासून या दोन संघामध्ये 6 सामने झाले आहेत. यामध्येही 4 सामन्यात विजय मिळवत स्पेन आघाडीवर आहे. न्यूझीलंडला मात्र दोन सामन्यातच विजय मिळवता आला.

जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर असलेल्या स्पेनची या विश्वचषकातील सुरूवात काहीशी निराशाजनकच झाली आहे. त्यांना पहिल्या सामन्यातच बलाढ्य अर्जेंटिनाकडून पराभव स्विकारावा लागला. त्यांनी या स्पर्धेत 2 सामन्यात चार गोल केले आहे तर न्यूझीलंडने 2 सामन्यात 2 गोल केले आहे.

स्पेनचा गोलकिपर कोरतेज किंक्कोने मागील सामन्यात महत्त्वाची भुमिका निभावत फ्रान्सचे अनेक हल्ले रोखले होते. आजचा सामन्यातही त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा राहिल.

पहिला विजय मिळवल्याने आनंदात असलेल्या न्यूझीलंडला दुसऱ्या सामन्यात मात्र एकही गोल करता आला नाही. त्यांना अर्जेंटिनाकडून तीन गोल फरकाने पराभूत व्हावे लागले.

सध्या अ गटाच्या गुणतालिकेत न्यूझीलंड 3 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर स्पेनच्या खात्यात मात्र एकच गुण आहे. दोन्ही संघाला हा विजय आवश्यक आहे.

आज होणाऱ्या स्पेन विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

स्पेन- डेलास मिगल (कर्णधार), कोरतेज किंक्को (गोलकिपर), एनरिक सेर्गी, सॅमचेज रिकोर्डो, सेराहिमा मार्क, रोडरिग्ज इग्नासिओ, गोंजालेज एनरिक, इग्लेसियास अल्वारो, सालेस मार्क, सानटाना रिकार्डो, अराना डियागो, लीयोनार्ट झावी, डे फ्रुटोस अलेजांड्रो, टोरास इग्नासी, गार्सीया मार्क, बेलट्रान अल्बर्ट, रोमियो जोस्प, गॅरीन मारिओ (गोलकिपर), क्यंमडा पाऊ, बोल्ट मार्क

न्यूझीलंड- टरंट ब्लेर(कर्णधार),  बेननेट कॉरी, स्टीफन जेनेस, ह्यूगो इंग्लिस, मार्क्यूस चिल्ड्स, एनरसन जॉर्ज (गोलकीपर), जॉयस रिचर्ड (गोलकीपर), लेट डेन, मूइर जॉर्ज, न्यूमॅन डॉमिनिक, अरुण पंचिया, जारेद पंचिया, फिलिप्स हेडन, रॉस निक, रसल केन, सारीकाया एडेन, वूड्स निक, मॅक्लेसे शेआ.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: मलेशिया-पाकिस्तान दोन्ही संघाची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम

कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट

धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण

You might also like