14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
या विश्वचषकात 16 देश सहभागी होत असून त्यांचे प्रत्येकी चार गट करण्यात आले आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दूरदर्शनवर होणार आहे. तसेच सर्व सामने भूवनेश्वरमध्ये होणार आहेत.
तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 16 डिसेंबरला होणार आहे.
असे आहेत या स्पर्धेसाठीचे चार गट,
गट अ- अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स
गट ब- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन
गट क- बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
गट ड- नेदरलॅंड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान
आश्चर्याची बाब म्हणजे आठ वेळेचा ऑलिंपिक चॅम्पियन असलेला भारत एकदाच विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. 1975 मध्ये भारताने पहिला विश्वचषक अजित पाल सिंगच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यामुळे तब्बल 43 वर्षानंतर भारताला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.
भारतीय संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. तर नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ते ऑस्ट्रेलियाकडून 1-1 असे बरोबरीत आल्यावर पेनाल्टी शूट-आऊटमध्ये 3-1 असे पराभूत झाले होते.
तसेच एशियन गेम्समध्येही भारतीय संघाने साखळी फेरीत विक्रमी 76 गोल केले होते. मात्र उपांत्य सामन्यात मलेशियाकडून पेनाल्टी शूट-आऊटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. पण नंतर त्यांनी पाकिस्तानबरोबर कांस्य पटक पटकावले.
2010ला दिल्लीत झालेल्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. तर आताचा संघ मिडफिल्डर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करेल याकडे लक्ष असेल.
भारतीय संघ:
गोलकिपर- पीआर श्रीजेश, कृष्णा बहादूर पाठक
डिफेंडर्स- हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास
मिडफिल्डर- मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम (उपकर्णधार), निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित
फॉरवर्ड्स- आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिम्रनजीत सिंग
भारताचे सामने:
28 नोव्हेंबर 2018, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
2 डिसेंबर, 2018, भारत विरुद्ध बेल्जियम
8 डिसेंबर,2018, भारत विरुद्ध कॅनडा
(सगळे सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे)
महत्त्वाच्या बातम्या:
–वाढदिवस विशेष: टी२० स्टार सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील