---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध यष्टीरक्षक शाय होपने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

On: शनिवार, जून 1, 2019 1:55 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। शुक्रवारी(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. ट्रेंट ब्रिजवर पार पडलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात विंडीजचा यष्टीरक्षक शाय होपने यष्टीमागे शानदार कामगिरी करताना 4 झेल घेतले. या चार झेलपैकी त्याने 14 व्या षटकात पाकिस्तानचा फलंदाज बाबार आझमचा हवेत उडी मारत घेतलेला झेल शानदार होता.

विंडीजकडून 14 वे षटक ओशान थॉमस टाकत होता. त्याने या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट लेन्थचा टाकला. या चेंडूवर फटका मारायचा बाबर आझमने प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटला घासून यष्टीरक्षकाच्या दिशेले गेला. यावेळी यष्टीरक्षक होपनेही कोणतीही चूक न करता उजव्या बाजूला हवेत झेप घेत चेंडू अचूक टिपला.

त्यामुळे पाकिस्तानची आवस्था 4 बाद 62 धावा अशी झाली. या सामन्यात विंडीजकडून थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानचा डाव 21.4 षटकात सर्वबाद 105 धावांवर रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

पाकिस्तानकडून फकार जामन(22), बाबर आझम(22), मोहम्मद हाफिज(16) आणि वहाब रियाज(18) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

विंडीजकडून गोलंदाजीत थॉमस व्यतिरिक्त कर्णधार जेसन होल्डरने 3 विकेट्स, आंद्रे रसलने 2 विकेट्स आणि शेल्डन कॉटरेलने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विंडीजने ख्रिस गेलने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर 13.4 षटकात सहज पूर्ण केला. विंडीजकडून गेलने 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरननेही 19 चेंडूत नाबाद 34 धावांची तुफानी छोटेखानी खेळी करत विंडीजच्या या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अमीरने तीन विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचा असा आहे इतिहास

विश्वचषक २०१९: विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेले ५ विक्रम

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी ही आहे आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment