---Advertisement---

…म्हणून मुंबईच्या प्रशिक्षकाला नकोय ‘मेगा ऑक्शन’

On: शनिवार, नोव्हेंबर 21, 2020 11:28 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुढच्या हंगामाची तयारी करत आहे. आयपीएलचा पुढील हंगाम एप्रिल-मे या कालावधीत खेळला जावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. दोन हंगामादरम्यान कमी कालावधी असल्याने २०२१ मधील चौदाव्या हंगामापूर्वी ‘मेगा ऑक्शन’चे आयोजन करणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आयपीएलचे पाच विजेतेपद जिंकणार्‍या मुंबई इंडियन्स संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.

मेगा-ऑक्शन होऊ नये

गेली चार वर्ष मुंबईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत असलेला शेन बॉन्ड म्हणाला, “आम्हाला यापुढे देखील बोल्टसोबत काम करायला आवडेल. मला कायम वाटते, बोल्टच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा होऊ शकते. आम्ही त्याच्यात सुधारणा घडवून आणू शकतो. आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. मला वाटते, ‘मेगा ऑक्शन’ होऊ नये. जेणेकरून बोल्ट संघात कायम राहील.”

दिल्लीकडून ट्रेड केले गेले होते बोल्टला

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या संघाने बोल्टला दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ट्रेड केले होते. मुंबईचा हा डाव कमालीचा यशस्वी ठरला. बोल्टने हंगामात २५ बळी मिळवत मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्याचा सामनावीर होण्याचा मान बोल्टला मिळाला होता.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत बोल्टला दिली गेली आहे विश्रांती

वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत बोल्टला विश्रांती देण्याच्या निर्णयाचे बॉन्डने स्वागत केले. बॉन्ड सध्या न्यूझीलंड संघासोबत पाहुण्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. बॉन्ड लिंकन येथे सध्या विलिनीकरण कक्षात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा ‘हा’ शिलेदार ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच दबावमुक्त

‘हताश होऊ नको, मेहनत कर’, ‘या’ खेळाडूला सचिनने पाठवला होता खास संदेश

‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---