गतविजेत्या कोल्हापूरसह यजमान पुणे, गत उपविजेते नागपूर आणि मुंबई संघांनी येथे सुरु असलेल्या वायफा आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी येतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या या चारही संघांनी मिळून 29 गोलची नोंद केली. सहजगत्या विजय मिळवून त्यांनी आपली आगेकूच कायम राखली.
पुणे संघाने धुळे संघांवर 6-1 असा विजय मिळविला. धुळ्याने 18व्या मिनिटाला देविदास सोनावणेच्या गोलने सामन्याला सनसनाटी सुरुवात केली. मात्र, नंतर पुण्याच्या आक्रमक खेळापुढे त्यांचे काही चालली नाही. पुण्याकडून सुमित भंडारीने तीन गोल केले. एम. सुदीशने दोन गोल करून त्याला सुरेख साथ केली. त्यांचा सहावा गोल प्रतिक पाटीलने केले.
दुसऱ्या सामन्यात मुंबईने जळगावचे आव्हान 6-0 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मिनिटाला गोल करून मुंबईने आपला गोल धडाका सुरु केला.
मध्यंतरापर्यंतच त्यांनी 5-0 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात त्यांनी संथ खेळ केला. या सत्रात एक गोल नोंदवून त्यांनी आपले विजयाधिक्य वाढवले. हिमांशु पाटीलने दोन, तर ऍश्ले कोळी, उमेश पेराम्ब्रा आणि जॉन्सन मॅथ्यू यांच्या एक गोलची त्याला साथ मिळाली. मुंबईला एक स्वयं गोल मिळाला.
गतविजेत्या कोल्हापूरने नाशिकचा 10-0 असा धुव्वा उडवला. कोल्हापूरसाठी करण चव्हाणे चार गोल नोंदवले. ऋषिकेश मेठेने दोन, तर रोहन अदनाईक, ओमकार रॅटिक, प्रथमेश हेरेकर, प्रभु पवार यांनी एकेक गोल केला.
नागपूरने सुफियान नशेखच्या तीन गोलच्या जोरावर पालघरचा ६-० असा पराभव केला. नागपूरसाठी अबिद शेखने दोन, तर पी. थुषालने एक गोल केला.
निकाल-
मैदान 1 : परभणी : 1 (मोहम्मद सिद्दीकी 34वे मिनिट) वि.वि. नांदेड : 0
सोलापूर : 2 (वरुण भंडारी 25वे, अल्तमाश 28वे मिनिट) वि.वि. रत्नागिरी : 0
कोल्हापूर : 10 (रोहन आडनाईक 12वे; करण चव्हाण 23, 45, 67, 75 वे मिनिट. रुषिकेश मेठे 53, 68वे मिनिट, ओंकार रतीक 63वे; प्रथमेश हेरेकर 65वे; प्रभू पवार 70वे मिनिट) वि.वि. नाशिक : 0
पुणे : 6 (सुमित भंडारी 19, 45, 69वे मिनिट, सुदेश 65, 73वे मिनिट; प्रतीक पाटील 80+2वे मिनिट) वि.वि. धुळे : 1 (देविदास सोनवणे 18वे)
स्थळ : 2 : औरंगाबाद : 2 (रौफ खान 45वे, रोहित 70वे मिनिट) वि.वि. ठाणे: 1 (हर्ष प्रधान 33वे मिनिट);
सांगली : 0(4) (मुबारक नबाफ, इब्राहिम देसाई, संतोष कमळे, अरुण शरणा) वि.वि. सातारा: 0 (2) (यशवर्धन मोरे, सौरभ आडाव)
नागपूर : 6 (आबिद शेख 5वे, 11वे; सुफियान शेख 39वे, 73वे 80+4वे मिनिट; पी. थुशाल 77वे मिनिट) वि.वि. पालघर 0
मुंबई: ६ (हिमांशू पाटील 2रे,. 5वे मिनिट, सूरज सपके (स्वयं गोल), ऍश्ले कोळी 19वे मिनिट, उमेश पेरांब्रा 36वे; जॉन्सन मॅथ्यू 68वे मिनिट) वि.वि. जळगाव 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ
FIFA WC 2022: फ्रांस-अर्जेंटिनाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा रेफरी, चॅम्पियन्स लीगचा आहे अनुभव