सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुपारच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने केवळ ५७ धावा केल्या. या सत्रात तब्बल २७ षटके भारताकडून टाकली गेली परंतु दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने या सत्रात संयमी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू बाद झाले. त्यात व्हर्नोन फिलँडर ८५ चेंडूत २६ तर केशव महाराज ६ चेंडूत ८ धावा काढून बाद झाले.
या सत्रात फाफ डुप्लेसीने अतिशय संयमाने फलंदाजी केली. त्याने १२२ चेंडूत केवळ ३७ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजाच्या इशांत शर्माने ८ षटकांत ११, हार्दिक पंड्याने ९ षटकांत १४, जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १०, आर अश्विनने ५ षटकांत १५ तर मोहमंद शमीने १ षटकात ४ धावा दिल्या.
सामन्याचा आज चौथा दिवस असून आजचे एक सत्र अजूनही बाकी आहे.