---Advertisement---

एशियन गेम्सच्या बक्षीस रकमेतून घराची करणार डागडुजी- द्युती चंद

On: शनिवार, सप्टेंबर 1, 2018 5:07 PM
---Advertisement---

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्यपदक मिळवून देणारी धावपटू द्यूती चंद तिला मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून घराची डागडुजी करणार आहे.

ती जकार्तावरुन शुक्रवारी भारतात परतली आहे. तिला एशियन गेम्समध्ये दौन रौप्यपदक मिळाल्याने बक्षीस म्हणून ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 3 कोटी रुपये देणार असल्याचे घोषित केले आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार ती तिच्या यशाबद्दल म्हणाली, “हा माझा क्षण आहे. याचसाठी मी बऱ्याच काळापासून वाट पहात होते. मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही. अखेर माझ्या कष्टाचे मला फळ मिळाले.”

तसेच ती घराच्या डागडुजीबद्दल म्हणाली, “माझे घर अजूनही पक्के नाही. जे काही त्यातील काम झाले आहे ते आतून झाले आहे. पण घराच्या भिंती अजूनही मातीच्याच आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी मला बक्षीस रक्कम घोषित केली आहे. त्यामुळे आता मी घर परत बांधेल.”

“तसेच मी 2020 च्या टोकीयो आॅलिम्पिकसाठी काही महिन्यात सरावाला सुरुवात करेल. एकदिवस आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे हे माझे ध्येय आहे. पण हे रौप्यपदकेही काही कमी नाहित.”

द्युतीला याआधी 2014 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते.

तिने यावर्षीच्या एशियन गेम्समध्ये महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत प्रत्यकी रौप्यपदक मिळवले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच दिग्गज ‘अॅलिस्टर कूक’बरोबर असे घडले

 वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद

 बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment