भारतीय क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. एकेवेळी बीसीसीआय आपला सामना टेलिव्हीजनवर दाखविण्यासाठी दुरदर्शनला पैसा देत असे. हेच पुढे बीसीसीआयचे बलस्थान झाले व क्रिकेटचे प्रसारणातून येणाऱ्या पैशामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत पैसे यायला सुरुवात झाली. प्रसारणासाठी पैसे देणारी बीसीसीआय प्रसारणासाठी पैसे घेऊ लागली ती ही केवळ ३० वर्षांत.
सप्टेंबर २०१७मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीला मिळाले. अनेक मोठ्या कंपन्या यासाठी लिलावात असताना ‘स्टार इंडिया’ने तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहे. हे हक्क २०१८ ते २०२२ या पाच वर्षासाठी असून प्रत्येक वर्षाला बीसीसीआयला ३ हजार २६९ कोटी मिळणार आहेत. स्टारनेच बीसीसीआयकडून भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क ६११८ कोटी रुपयांना घेतले आहेत.
त्याबरॊबर बीसीसीआयने वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींचे हक्क विकून मोठी रक्कम उभी केली आहे. त्या सर्व गोष्टींचा महा स्पोर्ट्सने घेतलेला आढावा…
२०१७ ते २०२२ या वर्षांसाठी स्टार इंडिया भारतीय क्रिकेट बोर्डाला तब्बल १६,३४७.५० कोटी रुपये मोजणार आहे. सोनी यासाठी गेले १० वर्ष ८२०० रुपये मोजत होते.
२०१३-२०१७ या कालावधीत हक्कांच्या रकमेपेक्षा ही रक्कम तब्बल चौपट आहे.
सध्या स्टार स्पोर्ट्सकडे इंग्लंडचा भारतातील दौरा, ऑस्ट्रेलिया भारतातील दौरा, आयसीसीच्या स्पर्धा आणि आयपीएलचे प्रसारणाचे हक्क आहेत.
सध्या भारतीय संघाचा एक सामना प्रसारण करण्याचे ६० कोटी तर आयपीएल प्रसारणाचे तब्बल ५४.४९ कोटी भारतीय क्रिकेट बोर्डाला मिळत आहेत.
स्टार स्पोर्ट्स इंडिया एका आयपीएल मोसमासाठी तब्बल ३२६९.५० कोटी रुपये मोजते. याचा अर्थ प्रत्येक सामन्यासाठी ते ५४.४९ कोटी रुपये देतात . अगदी चेंडूत बोलायचं झालं तर २३.३ लाख रुपये एका चेंडूसाठी स्टार बीसीसीआयला मोजते.
आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स असणाऱ्या विवो कंपनीने भारतीय क्रिकेट बोर्डाला १ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२२ या काळासाठी २१९९ कोटी रुपये देणार आहे. २०१६-२०१७ या वर्षात विवो प्रत्येक वर्षासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाला १०० कोटी रुपये देत होते.
भारतीय क्रिकेट संघाला ओप्पो या चायनीज कंपनीने स्पॉन्सर्सशिप दिली असून यासाठी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी तब्बल १०७९ कोटी रुपये मोजले आहे. या काळात भारतीय संघ १४ मालिका घराच्या मैदानावर तर २० मालिका परदेशात खेळणार आहे. यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी विश्वचषक आणि टी२० विश्वचषक यांचा समावेश आहे. याबदल्यात त्यांना आपला लोगो पुरुष, महिला, अंडर १९ आणि भारतीय अ संघाच्या किटवर लावता येणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एका वर्षाच्या प्रसारणासाठी २८७ मिलियन अमेरिकन डॉलर, ऑस्टेलियाला १०० मिलियन अमेरिकन डॉलर, भारतीय क्रिकेट बोर्डाला १२५ मिलियन अमेरिकन डॉलर, बीबीएल स्पर्धेला २० मिलियन अमेरिकन डॉलर तर आयपीएलला ५०८ मिलियन अमेरिकन डॉलर मिळतात.
महत्त्वाचे लेख-
–स्पोर्ट्स चॅनेल्स पुढील ३० दिवस नक्की दाखवणार तरी काय?
–संपूर्ण यादी: भारतीय क्रिकेट बोर्डाला विविध माध्यमातून मिळणारे पैसे ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल !
ट्रेंडिंग घडामोडी-
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार
-इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट