सिडनी कसोटीत टीम इंडियाची अवस्था खराब झाली आहे. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवल्यानंतरही दुसऱ्या डावात भारतीय संघानं 141 धावांत 6 गडी गमावले. सध्या भारताकडे 145 धावांची आघाडी आहे. या कसोटीत सध्या ऑस्ट्रेलिया वरचढ असल्याचं दिसत आहे. मात्र काही माजी क्रिकेटपटूंच्या मते, या सामन्यात अजूनही भारतीय संघाचं पारडं जड आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठानच्या मते, सध्या सामना भारताकडे अधिक झुकलेला आहे. त्याच्या मते याचं प्रमाण 55-45 एवढं असून भारताच्या जिंकण्याची शक्यता अधिक आहे. दीपदास गुप्ता यांच्या मते, जर भारतानं ऑस्ट्रेलियाला 200 पर्यंतच टारगेट दिलं, तर टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, कारण ही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकुल आहे. मात्र जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार की नाही, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. इरफान पठानच्या मते, बुमराहसोबत भारत 185 तर त्याच्याशिवाय 200 धावा डिफेंड करू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं केवळ 10 षटकं गोलंदाजी केली. तो लंचनंतर केवळ 1 ओव्हर टाकू शकला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि त्यानं आपली जर्सी काढून टाकली. तो प्रॅक्टिस जर्सी घालून स्टेडियमबाहेर जाताना दिसला. यानंतर बातमी आली की, बुमराह सपोर्ट स्टाफसह पाठीचं स्कॅन करण्यासाठी गेला आहे. अद्याप त्याच्या फिटनेसबाबत कोणतंही अधिकृत अपडेट आलेलं नाही. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
ऑस्ट्रेलियाची मजबूत फलंदाजी पाहता, ते या मैदानावर 200 धावांचा पाठलाग अजिबात करू शकणार नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल. या मैदानावर सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग ऑस्ट्रेलियानेच केला आहे. त्यांनी येथे 287 धावांचं लक्ष गाठून विजय मिळवला होता.
सिडनीच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड देखील खूप खराब राहिला आहे. या मैदानावर टीम इंडियाला शेवटचा विजय 1978 मध्ये मिळाला होता. येथे भारतीय संघानं आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारतानं 1 सामना जिंकला तर 5 सामन्यांत संघाला पराभव पत्कारावा लागला. भारतीय संघ 7 सामने ड्रॉ करण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर, शेवटच्या डावात गोलंदाजी करणार?
सिडनी कसोटीत रिषभ पंतचा जलवा! एकाच खेळीत मोडले कपिल-गंभीरचे मोठे रेकॉर्ड
रिषभ पंतचे अर्धशतक, स्कॉट बोलंडचा कहर, सिडनी कसोटीचा दुसरा दिवस आंबट-गोड