---Advertisement---

कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध परदेशात विजय मिळविणारे ५ संघ, टीम इंडियाबद्दल घ्या जाणून

On: शुक्रवार, मे 1, 2020 2:10 PM
---Advertisement---

२०१७ सालात आयर्लंड व अफगाणिस्तान संघाला कसोटी सामन्यांचा दर्जा मिळाला. हे संघ अजूनही जास्त कसोटी सामने खेळले नाहीत. हे दोन देश सोडून जगात १० कसोटी खेळणारे देश किंवा संघ आहेत.

या १० पैकी केवळ ५ देश असे आहेत ज्यांनी कसोटी खेळणाऱ्या सर्व देशात एकतरी कसोटी सामना जिंकला आहे. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्युझीलँड, पाकिस्तान आणि भारत या देशांचा समावेश आहे.

ऐकून आपण आश्चर्य चकित व्हाल परंतु इंग्लंड झिम्बाब्वेमध्ये कधीही कसोटी सामना जिंकले नाही. ते झिंबांब्वेमध्ये २ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी दोन्ही सामने अनिर्णित ठेवले. १०००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या इंग्लंडला या देशात कधीही कसोटी सामना जिंकता आला नाही.

एकवेळचा दिग्गजांचा संघ असणारा वेस्ट इंडिजला श्रीलंकेत ११ कसोटीत तब्बल ७ पराभव पहावे लागले आहे तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.

श्रीलंका संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १५ कसोटी सामने खेळला असून त्यात १३ पराभव व २ अनिर्णित सामने त्यांना पहावे लागले आहे.

दुसऱ्या बाजूला याच श्रीलंका संघाला १० कसोटीत ११ पराभव पहावे लागले आहे तर ९ सामने अनिर्णित राहिले आहेत.

तर बांगलादेश संघ वेस्ट इंडिजमध्ये २ तर झिंबाब्वे व श्रीलंकेत प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. अन्य कोणत्याही देशात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. झिंबाब्वे संघाला बांगलादेशमध्ये २ तर पाकिस्तानमध्ये १ कसोटी विजय मिळवता आला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले

-सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद धोनीने का थांबवला???

-भारताच्या महान क्रिकेटपटूचा लाॅकडाऊन दरम्यान मृत्यु

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment