---Advertisement---

Valentines Day Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 5:22 PM
---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांना जेवढी रुची क्रिकेटपटूच्या विक्रमाविषयी जाणून घेण्यात असते, तेवढीच रुची त्यांना क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यातही असते. त्यातही जर एखाद्या भारतीय क्रिकेटपटूचा लव्ह अफेयर्सचा किस्सा म्हटलं, तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

अशीच रोमांचक कहाणी आहे भारताच्या माजी क्रिकेटपटूची, ज्याने कित्येक वर्षे तरी आपल्या लव्हस्टोरीला पडद्याआड ठेवले होते. हा क्रिकेटपटू म्हणजे मोहम्मद कैफ. व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण या लेखात कैफच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेऊया.

मोहम्मद कैफ २००७ मध्ये त्याच्या एका जवळच्या मित्राद्वारे पुजा यादव हिला भेटला होता. ती दिल्लीमध्ये पत्रकारिता क्षेत्रात काम करत होती. दोघांमध्ये पहिल्या मुलाखतीत चांगली मैत्री झाली आणि त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली. कैफ आणि पुजा हे ४ वर्षे एकमेकांना डेट करत होते.

दीर्घकाळ एकमेकांसोबत घालवलेल्या कैफ आणि पुजाने पुढे आपले पूर्ण आयुष्य सोबत घालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कैफने त्याच्या लव्ह अफेअरला इतके लपवून ठेवले होते की, त्याच्या जवळच्या मित्रांना लग्नाच्या दिवशीपर्यंत या गोष्टीचा सुगावाही नव्हता.

माध्यमातील वृत्तांमधील माहितीनुसार, कैफ हा पुराणमतवादी म्हणजे जुन्या विचारांच्या समजातून आला होता. त्यामुळे त्याला आपल्या लव्ह अफेयरला सर्वांपासून दूर ठेवावे लागले. मात्र, दोघांच्याही सोबत राहण्याचा ठाम निर्णयापुढे समाजातील लोकांचा दृष्टिकोन त्यांना क्षुल्लक वाटला. शेवटी २६ मार्च २०११ला कैफने पुजाशी लग्न केले.

मात्र, कैफने त्यांच्या लग्नाची बातमीलाही खूप रहस्यमय ठेवले होते. त्यांनी लग्नात केवळ आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रांना बोलावले होते. आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी, अशी दोन अपत्ये आहेत आणि दोघेही आपल्या जीवनात सुखी आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!

आरसीबीचा फायद्याचा सौदा! ‘या’ प्रतिभाशाली किवी फलंदाजाला ८० लाखांमध्ये घेतले संघात

मुंबईने घडविलेल्या ‘या’ गोलंदाजाला केकेआरने केले आपल्या ताफ्यात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---