---Advertisement---

Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 7:00 AM
---Advertisement---

केन विल्यमसन (Kane Williamson) हा न्यूझीलंड संघाचा कर्णधार असून तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावरील त्याच्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं आहे. मैदानावर जबरदस्त क्रिकेट खेळणारा विल्यमसन आपले वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र कसलीही वाच्यता करत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शक्य तेवढी गोपनीयता बाळगतो.

याच कारणास्तव, त्यांची प्रेमकथा देखील अनेकांना माहित नाही. काय आहे ती लव्हस्टोरी? आजच्या व्हॅलेंटाइन दिनानिमित्त आपण त्याची प्रेमकहाणी जाणून घेऊया.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची फलंदाजी उत्कृष्ट तर आहेच. परंतु तो एक चांगला कर्णधार आणि खूप चांगला खेळाडू देखील आहे. त्याने २०१० मध्ये भारताविरुद्ध कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून विल्यमसन मैदानात उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. केन विल्यमसन क्रिकेटच्या मैदानावर जितके साधेपणाने राहतो, तितकेच त्याचे वैयक्तिक जीवन ही साधे आहे.

सारा रहीम ही केन विल्यमसनची गर्लफ्रेंड आहे. जी पेशाने एक परिचारिका आहे. केन-साराची पहिली भेट खूपच रंजक आहे. केन एकदा त्याच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा दोघे एकमेकांना पहिल्यांदाच भेटले. साराला पहिल्यांदा पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. खरं तर साराला देखील केन आवडला. हळू हळू दोघेही चांगले मित्र बनले आणि नंतर ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता हे दोघेही काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनाही बर्‍याच वेळा एकमेकांसोबत पाहिलं गेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

जर पाहिले तर दोघांनाही आपल्या नात्याबद्दल गुप्तता ठेवायची आहे, परंतु आजपर्यंत कोणत्याही बड्या स्टारचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून लपलेले नाही. मग इतक्या मोठ्या क्रिकेट स्टारचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून कसे लपेल.

तसे पाहता सारा रहीमबद्दल बरेच वादंग निर्माण झाले होते. तिचे नाव पाकिस्तानशी जोडले गेले होते. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सारा ही एक पाकिस्तानी मुलगी आहे. सारा इंग्लंडमध्ये राहणारी असे. परंतु, काही लोकांचा असा विश्वास आहे की तिचे पूर्वज कदाचित पाकिस्तानी असतील जे नंतर न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.

महत्वाच्या बातम्या:

याला म्हणतात डेडीकेशन!! पहिल्या दिवशी चक्कर येऊन पडणाऱ्या ह्यूज एडमीड्सने दुसऱ्या दिवशी घेतली ग्रँड एन्ट्री

एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन

यंदाचा महागडा खेळाडू ठरताच ‘इशान किशन’ लागला नाचू, ‘झिंगाट’वर केला भन्नाट डान्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---