---Advertisement---

निवडकर्ते अजय रात्रा यांना किती पगार मिळणार? मुख्य निवडकर्त्याला बीसीसीआय देते ‘इतके’ वेतन

Ajay Ratra
---Advertisement---

बीसीसीआयने टीम इंडियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांची निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. सलील अंकोला यांची जागा घेणारे रात्रा हे भारतीय बोर्डाच्या निवड समितीमध्ये सामील होणारे पाचवे सदस्य आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये अजित आगरकर, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, श्रीधरन शरथ आणि अजय रात्रा यांचा समावेश आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांमध्ये गणल्या जाणाऱ्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यांना किती पगार मिळतो?, हे जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे.

या समितीत रात्रा उत्तर विभागाचे नेतृत्व करणार आहेत. अजय रात्रा यांची भूमिका गुरुवारपासून म्हणजेच 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफीपासून सुरू होईल. भारतीय संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अजय रात्रा पहिल्यांदाच भारतीय संघाची निवड करतील.

सर्वप्रथम, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचे वेतन जाणून घेऊया. माध्यमांतील वृत्तांनुसार, आगरकर यांना बीसीसीआयकडून वार्षिक 3 कोटी रुपये पगार दिला जातो. याआधी मुख्य निवडकर्त्याचा पगार एक कोटी रुपये असायचा, पण आगरकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारतीय बोर्डाने हा पगार वाढवला आहे. आणि आता ही रक्कम तीन कोटींवर पोहोचली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये समाविष्ट इतर चार निवडकांना वार्षिक 90 लाख रुपये मानधन मिळते. अजित आगरकर मुख्य निवडकर्ता झाल्यानंतर निवड समितीच्या इतर सदस्यांच्या पगारात वाढ झाल्याची चर्चा होती. मात्र त्यात किती वाढ झाली? याबाबत बोर्डाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

अजय रात्रा यांनी टीम इंडियासाठी 6 कसोटी सामने आणि 12 वनडे सामने खेळले आहेत. 42 वर्षीय रात्रा यांना आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेदरम्यान ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. आगरकर यांची गेल्या वर्षी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम विभागातील दोन निवडक होते. अंकोला आधीच समितीचा भाग होते.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा टीम इंडियाची वाट खडतर; मोठ्या स्पर्धेपूर्वी ईशान किशन संघाबाहेर!
ऑस्ट्रेलियाची त्यांच्याच घरात पळता भुई थोडी करू; भारताच्या माजी संघ निवडकर्त्याचा विश्वास

उंची 6 फूट 7 इंच, अवघ्या 20 वर्षाचा गोलंदाज करणार इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण!  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---