---Advertisement---

CT 2025: चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये सहभागी झालेल्या 8 संघांना किती पैसे मिळाले? विजेत्या संघावर पैशांचा पाऊस!

On: बुधवार, मार्च 12, 2025 11:10 PM
---Advertisement---

नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर (ICC Champions Trophy) रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले नाव कोरले. चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना (9 मार्च) रोजी खेळवण्यात आला. फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद पटकावले. यानंतर भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघांना किती पैसे मिळाले?

8) पाकिस्तान- 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान पाकिस्तान होता. दरम्यान पाकिस्तानला अंदाजे 2.20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

7) इंग्लंड– इंग्लंडसाठी 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानकडून इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडला 2.20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

6) बांगलादेश- बांगलादेश संघाचे विजयाचे खाते उघडले गेले नाही. बांगलादेशचा एक सामनाही पावसामुळे वाया गेला. या संघाला 3.94 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

5) अफगाणिस्तान- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला हरवून अफगाणिस्तानने मोठा अपसेट निर्माण केला होता. अफगाणिस्तान संघाला बक्षीस म्हणून 4.22 कोटी रुपये मिळाले.

4) ऑस्ट्रेलिया- या मेगा स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने धूळ चारली. जरी ऑस्ट्रेलियन संघ फायनलमध्ये पोहोचू शकला नाही, तरीही त्यांना मोठी रक्कम मिळाली. ऑस्ट्रेलियाला 5.3 कोटी रुपये मिळाले.

3) दक्षिण आफ्रिका- दक्षिण आफ्रिकेलाही कोटी मिळाले. दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला बक्षीस म्हणून अंदाजे 5.32 कोटी रुपये मिळाले.

2) न्यूझीलंड- न्यूझीलंडला भारतापेक्षा निम्मी रक्कम मिळाली. फायनलमध्ये पराभूत झालेल्या न्यूझीलंडलाही खूप पैसे मिळाले. उपविजेता ठरल्याबद्दल संघाला 10.9 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

1) भारत- भारताला सर्वाधिक पैसे मिळाले. चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाला सर्वात जास्त रक्कम मिळाली. भारताला विजेतेपद जिंकल्याबद्दल 20 कोटी 48 लाख रुपये मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---