---Advertisement---

अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टी20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडल्यास ‘हे’ 3 खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 5:33 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अक्षर पटेल गंभीररित्या जखमी झाला. अक्षरच्या बोटांमधून रक्त येताना दिसले आणि त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. मात्र, अक्षरची दुखापत नक्की किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि बीसीसीआयने (BCCI) आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

अक्षरची दुखापत जर गंभीर असेल, तर तो टी20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. अक्षर जर विश्वचषकातून बाहेर झाला, तर त्याच्या जागी रियान परागला संधी मिळू शकते. रियान फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. तसेच, आयुष बदोनी देखील अक्षरची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. आयुषचा अलीकडेच वॉशिंग्टन सुंदरच्या जागी भारताच्या एकदिवसीय संघातही समावेश करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---