भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पहिल्या फेरीत मागील ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. विनेशने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती लढतीत जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे, जी 4 वेळा विश्वविजेता आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुसाकी 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकणारी होती. भारताची कुस्तीपटू विनेशने पहिल्याच फेरीत तिला चितपट करून भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
खरं तर, विनेश फोगटची कारकीर्द खूप वेगाने प्रगती करत होती, पण गेले दीड वर्ष तिच्यासाठी संघर्षमय ठरले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती गेल्या दीड वर्षांपासून अंदोलनाला बसली होती. डब्ल्यूएफआयने हे आरोप फेटाळले होते की विनेशचा प्रशिक्षक आणि फिजिओसाठी अर्ज शेवटची तारीख संपल्यानंतर आला होता.
याशिवाय त्यांनी (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग आणि संजय सिंग यांच्यावरही आरोप केला होता की, त्यांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. विनेशचा त्रास इथेच थांबला नाही कारण ती त्या 3 प्रसिद्ध कुस्तीपटूंमध्ये होती (विनेश, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक) ज्यांनी ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक छळाचा आरोप करत त्याच्या विरोधात आंदोलन केले होते. पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द बोलण्यास ईच्छा व्यक्त केले नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. आता त्याच मुद्यांवरुन बजरंग पुनियाने मोदींवर वक्तव्य केला आहे.
तो म्हणतो की, मी फोनची वाट पहातोय, कारण विनेश फोगट आता परत ‘भारत की बेटी’ झाली आहे. ती सुवर्ण पदकाच्या दिशेने आगेकूच केली आहे.पण त्यावेळी ज्या व्यक्तीने जंतर मंतर आंदोलनावेळी एक शब्द काढला नाही, तेच पंतप्रधान आता कोणतं धाडस एकवटून विनेशचे कसं अभिनंदन करतील?
Bajrang Punia tears apart Narendra Modi 🔥
He says :
“I am waiting when the call will be connected, when #VineshPhogat will become India’s daughter again, the man who did not say a word on Jantar Mantar protest, I am curious to see how hw will gather the courage and… pic.twitter.com/TFsZgQTgTY
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 6, 2024
हेही वाचा-
“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघासाठी….” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सुंदरनं दिली प्रतिक्रिया
नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!
T20 World Cup: सत्तापालटानंतर बांग्लादेशवर टांगती तलवार, टी20 विश्वचषकाचे यजमानपद धोक्यात