Loading...

टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी झालेल्या मुलाखतीत तो प्रश्न विचारलाच

शुक्रवारी(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश होता.

या सल्लागार समीतीने शुक्रवारी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षक म्हणून फेरनिवड करण्याआधी शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मूडी, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

या मुलाखतीदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल मि़ड-डेने दिलेल्या वृत्तानुसार 5 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने खूलासा केला आहे.

या प्रश्नावर सल्लागार समीतीला उत्तर देताना या उमेदवाराने सांगितले की ‘मी सल्लागार समीतीला पहिल्यांदा सांगितले की त्या दोघांमध्ये कोणतेही वाद नाही आणि विराटनेही असे कोणतेही वाद नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मला माहित नाही की या प्रश्नाचे कसे उत्तर द्यावे. पण असे काही असते तर मी ताबडतोब पाऊले उचलली असती आणि वाद थांबवले असते.’

‘मी हे वाद वाढवण्यास परवानगी दिली नसती. तसेच मी याबद्दल बीसीसीआयलाही सामील करुन घेतले असते आणि त्यांना सर्व माहिती दिली असती. कारण मला आनंदी आणि निरोगी ड्रेसिंग रुम हवे आहे. जर असे काही आत्ता आहे तर वर्तमानातील प्रशिक्षक हे वाद का सोडवू शकले नाही.’

Loading...

विराट आणि रोहितमधील वादाचे वृत्त 2019 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत आले होते. पण विराटने वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी असे कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सध्या कुणाचे किती आहेत गुण?

सोशल मीडियावरील विराटच्या फाॅलोवर्सचा आकडा ऐकून अवाक व्हालं!

असं काहीतरी करा, सौरव गांगुलीचे जगातील संघांना चॅलेंज

You might also like
Loading...