---Advertisement---

IND vs ENG । ध्रुव जुरेलला टीम इंडियात संधी मिळाल्याने कुमार संगकारा खुश, वाचा काय आहे कनेक्शन

Dhruv Jurel
---Advertisement---

भारत विरूद्ध इंग्लंड(India vs England) यांच्यात होणारी 5 सामन्यांची कसोटी मालिका येत्या 25 जानेवारीला चालू होणार आहे. यातील पहिल्या 2 सामन्यांकरीता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात 22 वर्षीय ध्रुव जुरेलची पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्या प्रदर्शनाबाबत प्रत्येकाच्या मनात कुतूहल आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने खास प्रतिक्रिया दिली. 

राजस्थान रॉयल्सचा ‘कोच’ संगकारा झालाय खूश
ही बातमी कळताच कुमार संगकारा मात्र भलताच खूश झाला आहे. संगकाराने ध्रुव जुरेल याच्यासोबत राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) संघात काम केले आहे. माध्यमांशी बोलताना संगकारा म्हणाला, “ध्रुवचे वर्क एथिक आणि वागणूक एकदम खास आहे. त्याला दबाव काय असतो हे समजतो. मागच्या आयपीएल(IPL) मध्ये त्याने आमच्यासाठी एकदम कठीण परिस्थितीत धावा केल्या होत्या. त्यामूळे दबाव काय असतो हे त्याला माहित आहे. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅट्सचा तो मॅच विनर आहेच. परंतु कसोटी क्रिकेट खेळताना त्याच्या फलंदाजीचे परीक्षा होणार हेदेखील नक्की आहे.” (He understands pressure and an absolute match-winner’)

भारतीय संघासाठी दर्जेदार खेळाडू घडवण्याचा राजस्थान रॉयल्सचा कायमच प्रयत्न राहिला आहे, असेही संगकारा यावेळी म्हणाला. ध्रुवचा डेवलपमेंट कॅंप ते भारतीय संघापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप खास आहे.

2023 मध्ये केली होती जबरदस्त कामगिरी
ध्रुवने आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त केली होती. खेळलेल्या 13 सामन्यांत त्याने तब्बल 172 च्या स्ट्राइक रेटने 152 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या धावा त्याने अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या फिनिशरच्या भूमिकेत केल्या होत्या. (“Very proud and happy” – Kumar Sangakkara on Dhruv Jurel getting maiden call-up to Team India)

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

महत्वाच्या बातम्या – 

कर्नाटक संघाला मोठा धक्का, चालू सामन्यात प्रसिध कृष्णा जखमी, उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता

IND vs AFG: ही तर धोनीची कृपा! सामनावीर ठरल्यानंतर शिवम दुबेने दिले कॅप्टन कुलला श्रेय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---